Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

गंगाखेड रेल्वेस्थानकात चार रेल्वेप्रवाशी गाड्याना थांबा देण्यात यावा-प्रवाश्यांची मागणी

Responsive Ad Here
गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे
गंगाखेड शहराला प्रति दक्षिण काशी म्हणून भाविकात श्रध्दास्थान आहे.संत जनाबाई जन्मभुमी असल्याने येथे संत जनाबाई मंदिरात दर्शनासाठी भारतातुन मोठ्या संख्येने भाविक येतात.तसेच व्यापारी बाजारपेठ मोठी असल्याने प्रवाशी संख्या अधिक आहे.कोरोना काळात लाँकडाऊनपासून चार एक्स्प्रेस रेल्वे प्रवाशी थांबा असलेल्या रेल्वेगाड्याचा गंगाखेड येथील थांबा बंद आहे.या रेल्वेगाड्या पुर्ववत येथील थांबा देण्याची मागणी प्रवाशातुन होत आहे. गंगाखेड रेल्वेस्थानकात कोरोना लाँकडाऊनपासून बंद झालेल्या रेल्वे गाड्यापैकी अमरावती - पुणे, धनबाद- कोल्हापूर, नागपुर - कोल्हापूर, शिर्डी - काकीनाडा या रेल्वेगाड्या गंगाखेड रेल्वेस्थानकातुन जातात.मात्र गंगाखेडचा थांबा बंद केल्याने प्रवाशाची मोठी गैरसोय होत आहे.व्यापारी वर्गात या रेल्वेगाड्याचा गंगाखेड येथील थांबा बंद केल्याने नाराजी निर्माण झाली आहे.कोरोनापुर्वी अमरावती -पुणे, धनबाद-कोल्हापूर, नागपुर-कोल्हापूर, शिर्डी -काकीनाडा या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या थांबत होत्या.लाकडापासून आजपर्यत चार वर्षांपासून या एक्स्प्रेस गाड्याचा गंगाखेड येथील थांबा बंद केला आहे.यातील दोन रेल्वेगाड्या नागपुर- कोल्हापूर, शिर्डी - काकीनाडा या रात्रीच्या वेळी येतात.रात्रीच्या वेळीच्या या गाड्याना थांबा मिळाल्यास रात्र प्रवाशाची सोय होणार आहे.तसेच दिवसा जाणा-या एक्स्प्रेस रेल्वे अमरावती - पुणे, धनबाद- कोल्हापूर या गाड्याना थांबा दिल्यास दिवसा प्रवास करणा-या प्रवाशाची सोय होणार आहे.गंगाखेड शहरात भाविक भक्त हे दुर दुर येथुन येतात.त्यांच्यासाठी या एक्स्प्रेस गाड्याचा थांबा महत्वाचा आहे.संत जनाबाई जन्मभुमी असल्याने मोठ्या संख्येने भाविक गंगाखेड येथे दर्शनाला येतात म्हणून या रेल्वेगाड्याना थांबा देणे प्रवाशासाठी सोयीचे होणार आहे.व्यापा-यांना तसेच इतर प्रवाशाची सोय होण्याच्या दृष्टीने चार एक्स्प्रेस रेल्वेगाड्याना थांबा देण्याची मागणी प्रवाशातुन होत आहे.गंगाखेड शहराला धार्मिक दृष्टीकोन लक्षात घेऊन थांबा देण्यात यावा अशी मागणी चार वर्षांपासून होत आहे.या मागणीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशी वर्गात नाराजी पसरली आहे.