Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत सर्व शाळेमध्ये वाजविल्या व गायल्या जावेत,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी.

Responsive Ad Here
*केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते जय जय महाराष्ट्र माझ, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत राज्य गीत म्हणुन स्विकृत करण्यात आलेले आहे. सदर राज्य गीत हे अत्यंत आशयपुर्ण, स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे आहे. सदर राज्यगीत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वाजविले/गायले जाईल या अनुषंगाने सुचना निर्गमित करण्यात आलेले आहे. परंतु, त्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचे आढळुन येत नाही. त्यामुळे आपल्या अभिनस्त असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा व व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आपल्या स्थरावरुन सुचीत करावे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाबाबत राज्य गीत म्हणणे हे प्रत्येकालाचा स्फुर्ती देणारे ठरेल. या मुळेच शालेय शिक्षण व कीडा विभाग शासन परिपत्रक क. संकिर्ण-२०२४/प्र.क.१२७/एस.डी.-४ दि. १५ मार्च २०२४ या परिपत्रका व्दारे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणी यवतमाळ जिल्हयातील सर्व शाळांमध्ये करण्यासंबंधाने निवेदन देऊन मागणी आज मा. शिक्षण अधिकारी,प्राथमिक/माध्यमिक शिक्षण विभाग यवतमाळ यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी अभिजीत नानवटकर जिल्हा अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , यवतमाळ शहर उपाध्यक्ष प्रथमेश पाटील , सोनू गुप्ता , सागर झपाटे , प्रमोद शेवाळे , श्रावण गायकवाड , साईराम कवडे , तुषाल चोडके , यश शिंगारे , यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्तित होते..!