Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पूर्णा येथे डीवायएफआयकडून शहिदांना अभिवादन!
Responsive Ad Here
पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी 23 मार्च शहीद दिनानिमित्त डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पूर्णा समितीकडून कँडल मार्च काढत शहिदांना अभिवादन करण्यात आले.
कॉम्रेड भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीकारकांना ३१ मार्च १९३१ ला इंग्रजांनी फासावर लटकवले होते. या क्रांतिकारकांनी ऐन तारुण्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली होती. त्यांचे बलिदान विद्यार्थी, युवा पिढीला आणि सामान्य नागरिकांना आठवत रहावे, त्यांनी केलेले कार्य व त्यांचे विचार युवा पिढीने पुढे न्यावे अशा उद्देशाने संघटनेने या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
डी वाय एफ आय दरवर्षी या क्रांतीकारकांना विविध पद्धतीने अभिवादन करीत असते. मागच्या वर्षी त्यांनी विद्यार्थी युवकांचे शिक्षण आणि रोजगाराच्या समस्यांना घेऊन पूर्णा ते परभणी दोन दिवसीय पायी मोर्चा काढत त्यांना अभिवादन केले होते. यावर्षी निवडणुकीच्या कारणाने तसा मोर्चा काढता आला नाही परंतु पूर्णेतच कँडल मार्च काढण्याचे नियोजन केले होते.
कँडल मार्च मध्ये संघटनेचे कॉम्रेड नसीर शेख, जय एंगडे, अजय खंदारे, प्रबुद्ध काळे, अमोल पट्टेकर, सुबोध खंदारे, भूषण भुजबळ, गंगाधर प्रजापती, राज जोंधळे, वैभव जाधव, रत्नदीप काळे, दुर्गेश वाघमारे, निरंजन खंदारे, शुभम गायकवाड, तिरुपती वाघमारे, दिपक उफाडे, प्रतिक एंगडे, यश सुरडकर, सूरज फुलझळके, कृष्णा काकडे, सूरज जावडे, ओंकार सूर्यवंशी, रितेश देसाई आदींचा समावेश होता.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420