Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
उन्हाचा पारा वाढताच माठ खरेदीची लगबग तर कुलर दुरुस्तीला वेग.
Responsive Ad Here
केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते
यवतमाळ :-सध्या उन्हाचा पारा आता हळूहळू वाढू लागला आहे त्यामुळे थंड पाण्यासाठी यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी बाजारपेठेत माठ विक्रीसाठी दाखल झाले आहे त्याचबरोबर उन्हाची तीव्रता लक्षात घेता बाजारातील पंखे आणि कुलरच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे घरोघरी फ्रिज असले तरी लोकांनी थंड पाण्यासाठी मातीच्या माठालाच पहिली पसंती दिली आहे आज रोजी शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला माट विक्रीत्याची दुकाने थाटली आहे काळा आणि लाल रंगाचे मातीचे माट शहरातील बाजारपेठेत आहे 200 ते 300 रुपये प्रमाणे माट विकले जात आहे गत काही दिवसापासून झालेल्या वातावरणातील बदल झाल्यानंतर कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे वातावरणातील उष्णता वाढल्याने पाटणबोरी व ग्रामीण भागात उघडा जाणवू लागला आहे यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीसह उन्हाळा चांगला तापणार याची चाहूल लागली असून चार दिवसात पारा 40 अंशावरचा पोचला आहे साहजिकच नागरिकांनी ओढ कुलर खरेदी कडे वाढली आहे सध्या उन्हापेक्षा उखाडा जाणवू लागला आहे उकाडा आणि उष्णता यामधून सुटका करण्यासाठी घरोघरी कुलर आणि पंखे लावले जात आहे गुंडाळून ठेवलेले कुलर आणि पंखे सुरू करण्यात येत आहे तत्पूर्वी ते साठी दुरुस्त करण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे त्यामुळे कुलर आणि पंखे दुरुस्तीची दुकानात ग्राहकांची गर्दी होत असताना दिसत आहे व शेती कामाच्या वेळेतही बदल झाल्याचे दिसून येत आहे उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या काम करण्याच्या वेळा देखील बदलल्या आहेत सकाळी नऊ वाजता पासूनच उन्हाच्या झाळा बसणे सुरू झाले आहे वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळेच पहाटेच शेतकरी व शेतमजूर शेतीची वाट पकडताना दिसून येत आहे दुपारी विश्रांती घेत सकाळी व सायंकाळी शेतीची कामे उरकण्यावर शेतकरी व शेतमजूर भर देत आहे..!
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420