Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
जीवन संघर्षातून माझ्या साहित्याची निर्मिती-प्रा.डॉ.अनिल काळबांडे
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
जीवन जगतांना वाट्याला आलेला संघर्ष त्यातून केलेला जगण्याचा संघर्ष यातूनच माझ्या साहित्याची निर्मिती झाली असून मी जसं जिवन जगलो तेच माझ्या साहित्य निर्मिती च्या प्रेरणा ठरल्या त्या मी माझ्या कवितेतून मांडत आलो आहे, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक प्रो. डॉ. अनिल काळबांडे यांनी केले. ते येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आयोजित अतिथी व्याख्यान, 'कवी आपल्या भेटीला' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांची 'हुंकार' ही कविता बी. एससी. प्रथम वर्षाच्या अनिवार्य मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. या प्रसंगी 'हुंकार' आणि इतर कवितांचे गायनही त्यांनी केल व आपल्या साहित्य निर्मीतीचा प्रवाह सुद्धा या वेळी सांगीतला त्याच बरोबर विद्यार्थ्याना आपल्या मनातील भाव भावनांना लिहते करण्याचे आवाहनही केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रा. डॉ. के. बी. शिरसे याप्रसंगी उपस्थित होते. मराठी विभागातर्फे दरवर्षी अभ्यासक्रम पूरक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून 'कवी आपल्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. विठ्ठल जीवतोडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय, संचालन करून आभार प्रा. अभय जोशी यांनी मानले. महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि साहित्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. (सोबत फोटो )
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420