Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
भूकंपाच्या धक्क्याने परभणी जिल्हा हादरला,नागरीकांत भिती,हिंगोली व नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती
Responsive Ad Here
परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे*
परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी सोनपेठ,गंगाखेड, या तालुक्याच्या ठिकाणासह जिल्हातील अनेक गावात दि.२१ मार्च गुरुवार रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला भूकंपाचा धक्का बसल्याने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला आहे,भूकंपाचा धक्का
सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला सेलू तालुक्यातील सेलू शहरासह राजवाडी, बालुर, देवगाव फाटा, गिरगाव, खैरी,चिकलठाणासह काही ठिकाणी,सहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास नागरिकांना पाच सेकंद जमीन घरातील पलंग,दरवाजे, खिडक्या,पंखे, सह घरातील इतर वस्तू हलल्याचा भास झाला तर काही ठिकाणी भीतीला तडे बसल्याचे दिसून आले. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडून तातडीने आपल्या कुंटूबियांसह नातेवाईक मित्र परिवारासह इतर समाज बांधवांना सावध केले. भूकंपाचा धक्का परभणी जिल्हा सह शेजारी असलेल्या जिल्हा
हिंगोली व नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती हाती आली आहे.
*रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्युजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे*.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420