Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
अवैध देशी दारूच्या ३६० बॅटल जप्त,एकावर गुन्हा दाखल,गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील घटना
Responsive Ad Here
गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे*
गंगाखेड ते परळी रोडवरील एका हाॅटेलच्या पाठीमागे खताच्या गोणीत देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या ३६० देशीदारूच्या बॅटल पोलीसांनी जप्त केल्या असुन त्याची किंमत १२ हजार ६०० रूपये आहे.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्या फिर्यादीवरून अनिल चव्हाण राहणार शिवाजी नगर तांडा याच्यावर दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड पोलीसाचे पथक अवैध धंद्याची माहिती काढण्यासाठी पेट्रोलीग करत असतांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीसांनी गंगाखेड ते परळी रोडवरील दगडवाडी तांडा परीसरातील एका हाॅटेलच्या पाठीमागे छापा मारला.या छाप्यात त्यांना खताची गोणी आढळून आली.या गोणीत देशी दारूच्या ३६० बॅटल आढळल्या असुन त्याची किंमत १२ हजार ६०० रूपये आहे.पोलीसांनी या देशी दारूच्या बॅटल जप्त केल्या. ही कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी डाँ दिलिप टिप्परसे पोलिस निरिक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा मारण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख , पोलीस उपनिरीक्षक राणी बोडवे, पोलीस सुग्रीव सावंत यांनी सदरील छापा मारला.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्या फिर्यादीवरून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने देशी दारूच्या बॅटल बाळगल्या प्रकरणी अनिल चव्हाण यांच्यावर दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्युजसाठी गंगाखेड परभणी
प्रतिनिधी राजकुमार मुंडे*.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420