Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

प्रो.डॉ.अनिल काळबांडे यांना अस्मितादर्श डॉ गंगाधर पानतावणे राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
उमरखेड : साहित्य क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणार अस्मितादर्शकार डॉ . गंगाधर पानतावणे राष्ट्रीय पुरस्कार जागतीक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने जाहीर झाला असून या वर्षी परिसरातील मिलिंद महाविघालय मुळावा येथील मराठी विभाग प्रमुख तथा साहित्यिक प्रो डॉ अनिल काळबांडे यांच्या 'देशीकार लेण - रविचंद्र हडसनकर या समिक्षा ग्रंथाला घोषीत झाल्याचे पत्र महामंडळाने दिले आहे . स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून ३१ मार्च रोजी महामंडळाचा १० व्या वर्धापनदिनी नागपूर येथील मधूरम सभागृहात तिसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन (थायलंड -बँकाक ) चे अध्यक्ष तथा आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष , जेष्ठ समिक्षक प्रा डॉ श्रीपाल सबनीस (पुणे ) यांच्या हस्ते तर महामंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ दिपककुमार खोब्रागडे , आमदार विक्रम काळे , मिलिंद महाविद्यालय संभाजीनगर च्या प्राचार्य डॉ वैशाली प्रधान, नाटककार डॉ सुनिल रामटेके (मुंबई ) कादंबरीकार डॉ विदयाधर बनसोड (चंद्रपूर ) सह मान्यवरांच्या उपस्थीत प्रदान करण्यात येणार आहे . याही पूर्वी डॉ काळबांडे यांना साहित्य तथा चळवळीतील योगदान बदल अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले . विश्व शब्द मराठी साहित्य संमेलन थायलंड , दुबई , इंडोनेशिया , मलेशिया , नेपाळ श्रीलंका , भूतान ' तायवान ' मॉरिशष , मालदिव या देश्यात त्यांच्या साहित्यातील योगदान बद्दल गौरव करण्यात आला तर त् मलेशिया , बॅकाक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जिवन गौरव पुरस्कार , दिल्ली येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर एक्सलन्स अर्वाड , अ भा आंबेडकरी साहित्य संमेलनात राजाभाऊ ढाले वैचारिक लेखन पुरस्कार , उत्कृष्ट काव्य निर्मितीचा अस्मितादर्श साहित्य निर्मिती पुरस्कारा अनेक पुरस्काराने त्यांना देशविदेशात सन्मानित करण्यात आले आहे . जेष्ठ साहित्यिक प्रा रविचंद हडसनकर , डॉ जगदीश कदम , प्राचार्य नागनाथ पाटील, डॉ प्रेम हनवते , प्रशांत वंजारे , डॉ विजय जाधव प्रा अनूप नांदगावकर डॉ गजानन बनसोड डॉ अजय खडसे , डॉ युवराज मानकर डॉ सिद्धार्थ भगत ' प्रा विलास भवरे , प्रा महेश हंबर्डे , डॉ प्रदिप इंगोले प्रा ज्योती काळबांडे , प्रा अभय जोशी डॉ धनराज तायडे सह साहित्यिक मित्र मंडळींनी अभिनंद केले (सोबत फोटो )