Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

पुसद येथे गावठी पिस्टल सह दोन आरोपीना केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाची कार्यवाही

Responsive Ad Here
----------------- *विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला पहाटे सुमारास गोपणीय बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की, इसम नाम सचिन अशोक राउत रा. भिमनगर, काकडदाती पुसद व शुभम रमेश राउत यांच्या जवळ गावठी बनावटीची पिस्टल (कट्टा) असुन ते त्यांचे घरी थांबलेले आहेत व दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात आहेत. अशा विश्वसनीय माहिती वरुन पथकाने तात्काळ काकडदाती पुसद येथे पोहचुन प्राप्त माहितीची खातरजमा करणे करीता सचिन अशोक राउत यांचे घरी पंचासह घरझडती कामी गेले असतांना नमुद इसमास ताब्यात घेवुन गावठी पिस्टल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन बंदुक चुलत भाऊ शुभम याचेकडे असल्याचे सांगुन पळुन जान्याचा प्रयत्न केला तेंव्हा पो. स्टाफ चे मदतीने त्यास अटकाव करुन लागलीच शुभम रमेश राउत यास ताब्यात घेवुन नमुद दोघांनाही गावठी पिस्टल बाबत विचारपुस केली असता सचिन राउत याने सांगीतले की काही दिवसांपूर्वी त्यांनी गावठी पिस्टलने फायरिंगची प्रॅक्टीस केली होती व ती पिस्टल घराचे पाठीमागील स्वयंपाक खोलीचे शेड मध्ये ठेवली असल्याचे सांगीतल्याने सदर ठिकाणाची पाहाणी केली असता स्वयंपाक खोलीचे शेड मधील एका पिशवी मधुन एक गावटी बनावटीची पिस्टी (देशी कट्टा) किमंत ३०,००० रु व ०२ नग पितळी काडतुस किमंत १०००/- रु असा एकूण ३१,००० रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करुन आरोपी १) सचिन अशोक राउत वय २५ वर्षे, २) शुभम रमेश राउत वय २६ वर्षे. दोन्ही रा. भिमनगर बुध्दविहार जवळ काकडदाती पुसद यांचे विरुध्द पोलीस स्टेशन पुसद शहर येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रेवन जागृत, पोलीस अंमलदार सुभाष जाधव, तेजाब रणखांब, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, मोहंमद ताज, सर्व स्थागुशा यवतमाळ, व मपोशी इंदू पवार पो.स्टे. पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.