Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
बोलेरो वाहानासह १७ लाख ५८ हजाराचा गुटखा जप्त,जिंतुर पोलीसांची गुटखा माफीयावर मोठी कारवाई
Responsive Ad Here
परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे
परभणीच्या जिंतूर येथील पोलीस पथकाने शिवाजीनगर येथिल एका मंगल कार्यालय परिसरात दि. २२ मार्च शुक्रवार रोजी रात्री ११.३० च्या सुमारास बोलेरो पिकअप वाहनात असलेला १० लाख ५८ हजाराचा गुटखा जप्त केला.सदरील वाहन ताब्यात घेतले.जप्त केलेल्या वाहनासह गुटखा मिळून एकुण मुद्देमाल १७ लाख ५८ हजार रूपये किंमत आहे.सहायक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शहाजी डोबे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वाहनामध्ये १० लाख ५८ हजार ४०० रुपयाचा गुटखा होता. वाहनासह एकूण १७ लाख ५८ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर प्रकरणी एकावर जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलीस अंमलदार मुरकुटे, होमगार्ड बुधवंत, सय्यद अनवर, कामिटे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलीसांनी एमएच २२ एएन १५८१ या क्रमांकाचे संशयीत वाहन थांबवून त्याची पाहणी केली असता सदर वाहनात गोवा गुटखा मिळून आला. पोलीसांनी या वाहनातून १० लाख ५८हजार ४०० रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. तसेच ७ लाखाचे एक वाहनही ताब्यात घेतले आहे. सपोनि. आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शहाजी डोंबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सय्यद करत आहेत.जिंतुर पोलीसांनी केलेल्या मोठ्या गुटखा कारवाईने गुटखा माफीयात भितीचे वातावरण पसरले असुन या कारवाईची वचक या माफीयावर बसली आहे.अशा प्रकारच्या कारवाया गंगाखेड तालुक्यात होणे अपेक्षित असुन मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येते.गंगाखेड तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी गुटखा विक्री होतो.मात्र याकडे गंगाखेड पोलीसाचे साफ दुर्लक्ष आहे.नागरीकात गुटखा विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420