Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

अवकाळी पावसामुळे बोरी मंडळात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान!

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
पुसद तालुक्यातील बोरी (खु)मंडळात रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बोरी (खुर्द) मंडळासहित बोरी (मच्छिंद्र), बोरगडी, मांडवा, सांडवा, काकडदाती, कोपरा, वडसद, कारला, धनसळ, मनसळ अशा इतर गावात रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू हा जमीनदोस्त झाला आहे तर ज्वारी हे पीक सुद्धा आडवे झाले आहे. तसेच भुईमूग, भाजीपाला काही प्रमाणात हरभरा अशा विविध पिकाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तसेच आणखीन तीन चार दिवस अवकाळी पाऊस राहील असा हवामान अंदाज वर्तविन्यात आलेला आहे . तरी शासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी यांच्या कडून मोठ्या प्रमाणात होत आहे.