Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
लोकशाहीच्या संवर्धनासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे-प्रो डॉ अनिल काळबांडे
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
: देशात सामाजिक आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापित करणे हे संविधानाचे ध्येय आहे .लोकशाही ही डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली या देशाला फार मोठी देणगी आहे . त्यामुळे या देशातील समस्त लोकांना पहिल्यांदा सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळालेला आहे . अश्या अवस्थेत ,आजच्या परिस्थितीमध्ये लोकशाहीला वाचवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे . संविधानाचे रक्षण करणे ही गरजेचे आहे त्यामुळे शंभर टक्के मतदान करून लोकशाहीच्या संवधनाचे कार्य करावे असे आव्हान प्रख्यात विचारवंत प्रो. डॉ .अनिल काळबांडे यांनी केले . ते विडूळ येथे आयोजित बौद्ध समाज व्यवस्था अभिष्टचिंतन महामेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोहनराव मोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून किशोर भवरे , रामराव गायकवाड , चिमणाजी काळबांडे , प्रणिता कांबळे , प्रकाश पाईकराव , डॉ . नंदकुमार कांबळे, पत्रकार डॉ .अविनाश खंदारे ,अभिजीत पाईकराव प्रकाश पाईकराव , विद्वान केवटे , पत्रकार दत्तराव काळे पत्रकार संतोष मुडे यांची उपस्थिती होती . सायंकाळच्या या महाळाव्याचे आयोजन भदंत आनंद बोधी थेरो यांनी केले होते , ते म्हणाले , तथागत भगवान बुद्धाने आयुष्यभर शील समाधी व प्रज्ञेचा मार्ग शिकवला त्यांनी करुणा विकसित करण्याचा व समता स्वातंत्र्य यावर आधारित जीवन जगण्याचा मार्ग लोकांना दिला त्या मार्गाचे लोकांना स्मरण व्हावे या उद्दात हेतूने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते . कालवश लक्ष्मण धुळध्वज यांनी धम्मपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचेही या वेळी मान्यवरांनी स्मरण केले . ज यावेळी जेष्ठ उपासक चिमणाजी काळबांडे यांनी मनोगतातून ,बौद्ध धम्म हा सुख समृद्धीचा आहे मानवी विकासाचा आहे त्यामुळे .धम्माचं आचरण करणे गरजेचे आहे . तर प्राचार्य मोहनराव मोरे यांनी , संपूर्ण भारताला संविधानाचं संरक्षण कवच असताना त्या संविधानाला तोडण्याचा प्रयत्न या देशांमध्ये सुरू आहे तेव्हा आपण सगळे संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असल्याचे प्रतिपादन केले . तर किशोर भवरे यांनी ,श्रीलंकेतील बौद्ध धम्माचा इतिहास सांगून तेथील देशाचा झालेला विकास आपल्यापुढे मांडला . त्यामुळेच श्रीलंकेला रावणाचा देश नाही तर बुद्धाचा देश म्हणून ओळखतात तर रामराव गायकवाड यांनी , समाजाने एकत्र येऊन बाबासाहेबांच्या विचारावर चालणे गरज असल्याचे प्रतिपादन केले .तर प्रणिती कांबळे ,प्रकाश पाईकराव ' डॉ .नंदकुमार कांबळे यांनी यावेळेस या महामेळाव्याला शुभेच्छा देत आपली मनोगत व्यक्त केले . पुढे बोलताना डॉ . काळबांडे म्हणाले की , बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सुखाने जीवन जगण्यासाठी बुद्धाचा धम्म आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी संविधानिक अधिकार दिलेले आहे त्यामुळेच आपला विकास झालेला आहे .शिक्षणाच्या शस्त्राने आपल्या दारिद्र्याचे निर्मूलन करून मोक्याच्या आणि मार्याच्या जागी बसता आले . परंतू शिक्षणाचे खाजगीकरण करून आजचे शिक्षणच उध्वस्त केले आहे . पीवळ्या भाताच्या खिचडीत मुले शिकतील काय ही ?गावकुसाबाहेर राहणारा समाज टायकोटामध्ये आणि सूटबुटामध्ये आला तो बुद्धाच्या विनयाने माणूस म्हणून जीवन जगू लागला हे सर्व काही आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या हक्क अधिकारामुळे मिळालेले आहेत याची जाणीव ठेवून सर्व समाजाने आज एक होण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देमाजी काळबांडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा . गजानन दामोदर यांनी केले तर आभार मिलिंद धुळे यांनी मानले या महामेळाव्याला सहकार्य लक्ष्मण धुळे , दीपक केंद्रेकर , नारायण भवरे , मधुकर काळबांडे भास्कर धुळे अजय धुळे ,पांडुरंग धुळे ,अशोक दवणे , छायाताई धुळध्वज , शेरू काळबांडे , मास मुनेश्वर यशवंत शिवाजी काळबांडे सह विडूळ येथील समाज बांधवांनी केले . रात्रीला पुणे येथील गायिका मनीषा शिंदे व नाशिक येथील इंडियन आयडल प्रतीक सोळशे, नांदेड येथील माधव वाढवे यांचा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम संपन्न हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला .
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420