Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
विसवर्षीय पिडित मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार
Responsive Ad Here
गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे
पुणे येथील पिडित मुलीवर दोन वर्षापासून लग्णाचे आमिष दाखवून गंगाखेड येथे वारंवार अत्याचार केला. लग्न करण्याचा आग्रह केल्यास नकार दिल्याने पिडित मुलीने गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सोमनाथ नगर येथिल रोहन चव्हाण याच्या विरुद्ध विविध कलमान्वे अत्याचार केल्याचा गुन्हा दि.२८ मार्च रोजी दाखल करण्यात आला.
दोन वर्षापुर्वी मालेवाडी येथिल महाविद्यालयात रोहन चव्हाण याची ओळख झाली.यावेळी त्याने पिडितेचा मोबाईल नंबर घेतला.तेव्हा पासुन तो मोबाईलवर बोलत होता.मोबाईल वर सतत भेटण्याची सक्ती करत होता. त्यानंतर दोन वर्षापासून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने मोबाईल करून एकदा तरी भेटू म्हणत होता.दि.५ एप्रिल २०२२ रोजी त्याने गंगाखेड येथिल वरद लाॅजवर नेले.या ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.त्यानंतर वेळोवेळी दहा ते बारा वेळा अत्याचार केले.दि.८ डिसेंबर २०२३ रोजी त्याने परत वरद लाॅजवर बोलावुन अत्याचार केला.यावेळी मी लग्नाचा आग्रह धरला असता त्याने लग्नास नकार दिला.लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद पिडित मुलीने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली.या फिर्यादीवरून रोहन चव्हाण रा. सोमनाथ नगर याच्यावर विविध कलमान्वे अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर करीत आहेत.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420