Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
अधिकारी वर्ग ऐसी हवेच्या खोलीत मस्त,पुसदची जनता विजेच्या भारनियमनाने त्रस्त
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
पुसद ■ मागील काही दिवसांपासून पुसद शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अघोषित विज भारनियमन (लोड शेडींग) सुरु झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करवा लागत आहे. मात्र अधिकारी वर्ग वाटनुकुलीत कार्यालयाच्या खोलीत बसून राहात असल्यामुळे नागरिकांच्या समस्या त्यांना कश्या समजणार, ? सद्या लग्न सराई व मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. सकाळी ३ वाजता जागे होऊन ते दिवसभर कडक उपवास ठेवतात. अश्यात विजपुरवठा
तासंतास खंडित होत असतो. बाजारपेठ मध्ये देखील ग्राहक खरेदी साठी गर्दी करीत असतात त्याचवेळी बत्ती गुल होत आहे. वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती यांना देखील अघोषित लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्ये बद्धल
साकीब शहा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष साकिब शाह यांनी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देत भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान विज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाब विचारल्यास मेंटेनन्स चे काम सुरु आहे, असे उत्तर मिळते. तर अनेकदा रोहित्र बिघडल्याने विज पुरवठा खंडित होत आहे. एकाच रोहित्रवर क्षमते पेक्षा जास्त विज ग्राहकांच्या जोडन्या असल्यामुळे देखील दाब वाढून विज पुरवठा खंडित होत आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420