Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
सर्वसामान्यांना तीनशे रूपयात गॅस सिलेंडर
Responsive Ad Here
प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक
घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायात व हातगाडीवर व्यावसायिक वापर होतो, तर वाहनांमध्ये देखील घरगुती गॅस सिलिंडर पलटीचे काम शहरासह देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे बघायला मिळते. यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दरवाढ होत आहे. जर या घरगुती गॅस सिलिंडरचा वापर योग्य पद्धतीने झाला तर घरगुती गॅस सिलिंडर प्रत्येकाला ३०० रूपयांमध्ये मिळू शकते असा दावा ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
देशभरात घरगुती व व्यवसायिक असे दोन प्रकारचे सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर हे कमी असून त्याच्यावर आकारण्यात येणारा जीएसटी कर देखील व्यावसायिक सिलेंडर पेक्षा कमी आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडर स्वस्तात मिळते. मात्र या घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मागणी वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघायला मिळते. जर घरगुती गॅस सिलिंडर फक्त घरगुती कामासाठी वापरले गेले तर ते तब्बल ३०० रूपयांमध्ये सर्व नागरिकांना उपलब्ध होईल असा दावा सोलंकी यांनी केली आहे.दरम्यान घरगुती सिलेंडरवर ५ टक्के जीएसटी कर तर व्यावसायिक सिलेंडरवर १८ टक्के जीएसटी कर आकारणी केली जाते. परंतु व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याने सरकारचे नाशिक शहरातून जीएसटीचे तब्बल ५ कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत आहे. दरम्यान या प्रकरणी अन्न पुरवठा व पोलीस प्रशासन विभागाप्रमाणेच जीएसटी अधिकाऱ्यांनी देखील लक्ष घालणे क्रमप्राप्त झाले आहे.
एखाद्या ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर होत असल्याचे लक्षात आले आणि त्या ठिकाणी अन्न पुरवठा विभागाने कारवाई केली तर ते फक्त गुन्हा दाखल करत असतात. अन्न पुरवठा विभागाला अवैध गॅस सिलिंडरच्या एजन्सी चालकावर कारवाईचे अधिकार नाही. मात्र भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांना जर एखादी एजन्सी अशा पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचे निदर्शनास आले तर त्या एजन्सीचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आहे. परंतु हे विक्री अधिकारीच अशा अवैध व्यवसाय पुरवठा करणाऱ्या एजन्सीला पाठिशी घालत असल्याचा आरोप सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस सिलिंडरच्या वापराबाबत पोलीस व पुरवठा विभागाला ठिकाणांसह निवेदन दिले आहे. त्यामुळे आता शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा सुरू असलेला अवैध व्यावसायिक वापर थांबवण्यात संबंधित यंत्रणेला यश मिळते का हे बघावे लागेल.
असे मत नितीन सोळंके यांनी व्यक्त केले आहे.
*रिपब्लिकन वार्ता साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420