Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
सिजर झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उपजिल्हा रुग्णालयात'राडा'
Responsive Ad Here
विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ*
पुसद स्थानिक उपजिल्हारुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे,डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी राडा केला. शहर पोलिसांत याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.
भाग्यश्री प्रदीप धाईस्कर (२१) रा. सावरगाव गोरे, ता. पुसद असे मृत बाळंतिणीचे नाव आहे. भाग्यश्री पहिल्या बाळंतपणासाठी १८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती . सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनल भेलोंडे - पवार यांनी सिझेरियन केले. त्यावेळी बाळ व बाळंतीण सुखरूप होते. भाग्यश्रीला पहिली मुलगी झाल्याने नातेवाइकही आनंदी होते. परंतु रात्री उशिरा भाग्यश्रीची तब्येत बिघडली. तिला अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने खासगी दवाखान्यात शिफ्ट करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी भाग्यश्री धाईस्कर ही महिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचे सिझेरियन करण्यात आले. त्यावेळी बाळ व बाळंतीण सुखरूप होते.शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, रात्री ४ वाजताच्या सुमारास भाग्यश्रीची प्राणज्योत मालवली. तिचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र भाग्यश्रीच्या मृत्यूला डॉक्टरच कारणीभूत असल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात राडा केला. डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रुग्णालय व पोलिस प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे दृश्य निर्माण झाले होते.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420