Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
आज विडूळ येथे बौद्ध समाज व्यवस्था अभिष्टचिंतन महामेळावा
Responsive Ad Here
*विदर्भ उसंपादक राजेश ढोले*
अनेक बौद्ध भिक्षुसह विचारवंतांचे विचाराची प्रवणी उमरखेड : सर्व समाज बांधवांना तथागत भगवान बुद्धाचा सुखी जीवन जगण्याचा , दुःख मुक्तीचा मार्ग समजावा त्यांच्या अडीच हजार वर्षांपूर्वी दिलेल्या विचाराचे विचार मंथन व्हावे . सर्वसामान्य माणूस दुःखमुक्त व्हावा या उदात्त हेतूने तालुक्यातील विडूळ येथे दि : २४ रविवार रोजीअनेक बौद्ध भिक्षूंच्या व प्रबोधनकारांच्या अनमोल अशा विचाराचे मार्गदर्शन व्हावे समाज प्रबोधन व्हावे यासाठी बौद्ध समाज व्यवस्था अभिष्टचिंतन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजसेवक साहेबराव कांबळे तर या सोहळ्याचा उद्घाटन प्राचार्य मोहनराव मोरे हे करतील तर स्वागताध्यक प्रणिता कांबळे हया असून सांयकाळ च्या प्रबोधन सत्रात सातारा येथील प्रा . सुकुमार कांबळे , जगप्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ . अनिल काळबांडे यांचे फुले शाहु आंबेडकरी विचारासह बुद्धाच्या विचाराची सध्यस्थितीत आवश्यकता या विषयावर प्रबोधन होईल . मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी सत्कार सोहळा सुद्धा संपन्न होईल .सायंकाळच्या सत्रामध्ये गायीका मंजुषा शिंदे पुणे , माधव वाढवे 'रविराज भद्रे ,इंडीयन आयडल गायक प्रतीक सोळसे यांच्या प्रबोधनकारी गीतांचा कार्यक्रम संपन्न होईल . या कार्यक्रमाचे मुख्यआयोजन भदंत आनंदबोधी यांनी केले असून सकाळी मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण बुद्ध वंदना परित्राण पाठ होईल दुपारी पूजनीय भिक्षू संघाची धम्मदेशना होईल यात ताडोबा अभयारण्यातील विपश्य भदन्त ज्ञानज्योती महाथेरो , भदंत डॉ . खेमोधम्म महाथेरो ,तिबेट येथील भदंत कुंचक नामा , भदंत कितीपियो नागसेन , भदंत महामोगलयान मुंबई यांची प्रमुख धम्मदेशना होईल . सायंकाळच्या सत्रात मान्यवरांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष छायाताई धुळध्वज उपाध्यक्ष मिलिंद धुळे कार्याध्यक्ष देमाजी काळबांडे सचिव दीपक केंद्रेकर यांच्यासह विदुळ येथील कार्यकारणीच्या समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून असंख्य नागरिकांनी धम्मदेशनेचा व प्रबोधनाच्या विचाराचा लाभ घेण्याचे आवाहन सुयोजन समितीकडून करण्यात आलेले आहे .
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420