Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
आसोली येथील पाण्या साठीचा लढा यशस्वी,सरपंच,सदस्य आणि गावकऱ्यांचा येथोचित्त सत्कार
Responsive Ad Here
विदर्भ उसंपादक राजेश ढोले*
दिनांक 23 मार्च2024 रोजी आसोली गावातील पाण्याच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्या बद्दल पुसद तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आसोली येथे एकत्र येऊन गावकऱ्यांचा जाहीर सत्कार केला.
चाळीस वर्षापासूनच्या पाणीटंचाईचे संकट गावातील निडर स्वाभिमानी लोकांनी तीन वर्षात दूर केले याबद्दल प्रमुख उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांनी इथे प्रकर्षाने नमूद केले की पुसद तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जर अशा निडर स्वरूपाचे नागरिक तयार झाले तर या पुसद तालुक्याचा निश्चितच विकास होईल. यावेळी लढ्यातील सर्व महिलांचा पुष्पहार अर्पण करून तसेच संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
आसोली ग्रामवासीय सरपंच सदस्य तथा गावातील नागरिक यांच्या नेतृत्वाखाली हा लढा देणाऱ्या ग्रामपंचायत च्या सर्व सन्माननीय सदस्य व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बुद्धरत्न भालेराव यांनी यशवंत कोल्हे या सुशिक्षित तरुणाला साथ देऊन गावकऱ्यांनी खूप मोठे काम केले व गावकऱ्यांनी अशीच साथ देत रहावी
असे याप्रसंगी म्हणाले
हा सत्कार पाहून गावातील सर्व महिला गहिवरून गेल्या त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू ओथंबून वाहत होते.
या वेळी बुद्धरत्न भालेराव,शाकिब शहा,विजय बाबर,जयानंद उबाळे, ऋषिकेश जोगदंडे, संदीप आढाव,सचिन नंदागवळी,ज्ञानेश्वर मिरासे, गजानन लेकुरवाळे,नारायण आढाव,दत्ता कुरकुटे आदी उपस्थित होते.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420