Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
गजबजलेल्या मालेगावातुन पोलिसांनी वेश बदलून चोरटे पकडले,शेंद्रा व शिवना येथून बारा लाखांहून जास्तीचे मुद्देमाल चोरनारे चोरटे जेरबंद
Responsive Ad Here
फुलंब्री औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा
औरंगाबादच्या चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीतील शेंद्रा शिवारातून व अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील शिवना येथून स्पेअर पार्टची दुकाने फोडून चोरी करणारे आंतरजिल्ह्यातील चोरटे पोलिसांनी मालेगावच्या गजबजलेल्या वस्तीतून वेशांतर करून मुद्देमालासह पकडले,
चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीतील शेंद्रा शिवारात प्रकाश कचकुरे राहणार कुंबेफळ करमाड यांचे संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाचे ऑइल ग्रीस बेल्ट इत्यादी वाहनाचे स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान दिनांक 18 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर व कुलूप तोडून दुकानातील 93 ग्रिसच्या बकेट, संगणक, प्रिंटर, चहा कॉफी बनवणारे मशीन असे साहित्य चोरून नेले होते, या अनुषंगाने पोलीस ठाणे चिकलठाणा येथे भादवि कलम 380, 461 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,
याचप्रमाणे 23 फेब्रुवारी रोजी अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील शिवना येथील महाराष्ट्र ऑटो पार्ट्स व गॅरेज येथील सुद्धा दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून दुकानातील ऑइल गॅलन, टायर, शॉकअप, गॅस किट इत्यादी साहित्य चोरून नेले होते ,याबाबत शेख अझहर शेख सलीम राहणार शिवना तालुका सिल्लोड यांचे फिर्यादीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात कलम 380, 461 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर मनीष कलवानिया यांनी पोलीस ठाणे चिकलठाणा व अजिंठा यांचे सह नमूद गुन्ह्यांचे समांतर तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले होते, यावरून पोलीस निरीक्षक सतीश वाघ, स्थानिक गुन्हे शाखा यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांचे पथकासह आरोपींचा शोध घेण्याबाबत नेमले असता नमूद गुन्ह्याचा बारकाईने माहिती घेऊन चोरी करणाऱ्या टोळीचा कसोशीने शोध त्यांनी सुरू केला, यावेळी आरोपींचा माग काढताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद दोन्ही दुकानेही मालेगाव जिल्हा नाशिक येथील सराईत गुन्हेगारांनी फोडली असून त्यातील माल घेऊन ते पसार झाले आहे, यावरून सदरील पोलीस पथक मालेगाव शहरात वेशांतर करून तीन चार दिवस गजबजलेल्या वस्तीत आरोपींचा शोध सुरू केला यावेळी तेथील बऱ्याच परिसरात रात्र दिवस कसोशीने शोध घेतला असता तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयित आरोपी हे मालेगावच्या रमजान पुरा परिसरातील एका पत्र्याचे गोडाऊनमध्ये लपून बसल्याचा सुगावा लागला यावेळी पथकाने रमजान पुरा परिसरात रात्री बारा वाजेच्या सुमारास सापळा लावून एका आरोपीला पकडले व त्याला विचारपूस केली असता एक आरोपी गोडाऊन मध्ये असल्याचे त्याने सांगितले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांची नावे आसिफ इकबाल शेख अहमद वय 30 वर्षे राहणार अजमल हॉटेल जवळ रमजान पुरा मालेगाव व दुसरा आरोपी मुजसीर अहमद जमीर अहमद वय 28 वर्षे राहणार नूरबाग रमजान पुरा असे सांगितले, त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दोन्ही दुकाने इतर साथीदारासह फोडून त्यातील माल चोरून नेल्याची कबुली दिली, त्या दोन्ही चोरट्याकडून चोरीचे बारा लाख 18 हजार 554 चा मध्यमाल जप्त करण्यात आला आहे, या दोघांना अटक करून इतर साथीदारांचा पोलीस कसोशीने शोध घेत आहे,
नमूद कारवाई छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस अंमलदार शेख कासम, गोपाल पाटील, विठ्ठल डोके, नरेंद्र खंदारे, योगेश तरमळे, संजय तांदळे यांनी केली.
*रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420