Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

फुलंब्रीत डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रधान तर सचिवपदी संदीप मोरे

Responsive Ad Here
फुलंब्री औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा फुलंब्री शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित प्रधान, उपाध्यक्षपदी अमोल गंगावणे, देवेंद्र गंगावणे, सागर गवळे तर सचिवपदी संदीप मोरे यांची निवड करण्यात आली आहे. फुलंब्री शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात शनिवार दि. 30 रोजी रात्री 8 वाजता जयंती उत्सव समिती कार्यकारणी निवडीबद्दल बैठक घेण्यात आली. या बैठकीत वरील प्रमाणे कार्यकारणी तयार करण्यात आली असून उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे सहसचिव विशाल सुरेश गंगावणे, कार्याध्यक्ष विजय गवळे, कोषाध्यक्ष जे.पी.शेजवळ, सहकोषाध्यक्ष राजू प्रधान, संजय मोरे, सल्लागार डॉ. के.बी. हिवराळे, अजय गंगावणे, संजय प्रधान, बाबासाहेब गंगावणे, संजय हिवराळे, दिलीप साळवे, सुरेश प्रधान, संजय इंगळे, रंगा भुईगळ, किरण गंगावणे, बाळू गंगावणे, विशाल गंगावणे आदींची कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. यावेळी सुरेश प्रधान, दिलीप गंगावणे, जितेंद्र साळवे, सुशमेश प्रधान, नागेश भारद्वाज, दिनेश खंडाळे, ऋषिकेश सुरडकर, बाळू गंगावणे, दिनेश खंडाळे, विक्की गंगावणे, प्रतीक वाहुळ, सचिन प्रधान, आदित्य आठवले, आकाश गंगावणे, रोहित साठे, कुणाल गंगावणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती होती. या वर्षी विशेष म्हणजे सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळा व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येते. परंतु यंदा जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास ही विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.