Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
हजारो भाविकांनी घेतला हार्टफुलनेस ध्यानाचा अनुभव*
Responsive Ad Here
पैठण छ, संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ
आंतरिक शांतीपासून वैश्विक शांतीकडे' या विषयाला अनुसरून श्री रामचंद्र मिशन, हार्टफुलनेस संस्था यांच्या सहकार्याने वैश्विक अध्यात्मिकता महोत्सवा अंतर्गत नाथषष्ठी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान हार्टफुलनेस ध्यान व तणावमुक्ती तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या शिबिराचा समारोप झाला
पैठण येथील कावसानकर स्टेडियम समोर वामनभाऊ मंगल कार्यालयात हार्टफुलनेस ध्यान केंद्र पैठण च्या वतीने पायी वारी करुन येणाऱ्या भाविकांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ध्यानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रदर्शन व प्रत्यक्ष तणावमुक्तीसह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना प्रत्यक्ष ध्यानाचा अनुभव देण्यात आला. या तीन दिवसांमध्ये दोन हजार पेक्षा जास्त भाविकांनी हार्टफुलनेस तणावमुक्ती सह ध्यानाचा अनुभव घेतला.
पायी वारीचे सार्थक झाल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे नाथषष्ठी दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच पैठण विभागाच्या उपविभागीय महसूल अधिकारी नीलम बाफना, पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी देखील रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी रविवारी ध्यान शिबिरास भेट दिली .आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हार्टफुलनेसच्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तसेच ध्यान ही काळाची गरज असुन प्रत्येकाने ते करावे अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी हार्टफुलनेस पैठण केंद्राचे प्रशिक्षक शशिकांत घेर, भागिनाथ चव्हाण, राधाकृष्ण कुंढारे,महेश पाचोडे, बाळासाहेब मोरे, कमलाकर अंबर, प्रा. किसन माने, वेणु भादिकर , अलका मोरे, अन्नपूर्णा गायकवाड, भावना पवार, दशरथ खराद , शिवराज गायके, रामदास रामावत,विशाल गवळी सह सर्व अभ्यासी बंधु भगिनींनी परिश्रम घेतले.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420