Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
बेलोरा येथील चिमुरड्या बहीण भावाच्या दुर्दैवी मृत्यु
Responsive Ad Here
विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
पुसद तालुक्यातील बेलोरा येथील दाम्पत्य सदानंद नामदेव पोले व शीतल सदानंद पोले हे अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथे आपल्या दोन मुलांसह एक वर्ष पासून काम करत होते. रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी दुपारी जेवण आटोपल्या नंतर आराध्या सदानंद पोले 6 वर्षे व सार्थक सदानंद पोले 3 वर्षे हे झोपी गेले.सायंकाळ झाली तरी झोपेतून उठत नाही म्हणून आई शीतल ही मुलांना उठवायला गेली असता मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने स्थानिकांच्या मदतीने उपचारकामी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.शीतल सदानंद पोले यांनी फिर्याद दिली. मुलांचे शव विच्छेदन जे जे रुग्णालय मुंबई येथे करून पोलीसांनी अधिक चौकशी करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले.दोन्ही बहीण भावाचे मृतदेह मुंबई येथून अँब्युलन्स ने त्यांच्या मूळगावी बेलोरा येथे दिनांक 1/4/2024 रोजी रात्री 11 वाजता आणले असता गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बहीण भावाचा असा अचानक मृत्यू होण्याची घटना पहिल्यांदा च झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करत होते. रात्री 11.45 वाजता पैनगंगा मोक्षधाम येथे बहिण व भावाला एकाच सरणावर गावातील लोकांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थित अंतिम संस्कार करण्यात आल्याने अनेकांचे डोळे पाणावले. चिमुकल्या बहिण भावाच्या मृत्यूने गावातील सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. माळपठारावरील भागात रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक नागरिक मुंबई ,पुणे नाशिक अशा मोठ्या मोठ्या शहरात जीव धोक्यात घालून कामासाठी स्तलंतरित होतात.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420