Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

प्रचाराच्या वाहन परवानगीवरुन भाजप- एमआयएम आमनेसामने, पैठण शहरातील घटना

Responsive Ad Here
पैठण/ प्रतिनिधी सुनील आडसुल पैठण :-गेल्या दोन दिवसापासुन शहरात भाजपाच्या प्रचाराचे वाहन फिरत असतांना परवानगीची चौकशी केल्यावरुन भाजप व एमआयएमचे पदाधिकारी कार्यकर्ते आमने सामने आले होते, शेवटी प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन मिटले की दाखल झाले हे कळु शकले नाही. जालना लोकसभेच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपच्या केंद्रिय प्रचार यंञनेकडून एक व्हॅन शहरात याञे निमित्त प्रचारासाठी पाठवण्यात आली होती, स्थानिक प्रशासनाकडून परवाणगी घेतली का ? या बाबत एमआयएमचे शहराध्यक्ष निसार बागवान यांनी वाहन चालकाकडे चौकशी केली असता, वाहनचालकाने स्थानिक भाजपा पदाधिकारींशी संपर्क केला.यावेळी भाजपाचे स्थानिक नेते तथा माजी नगरअध्यक्ष सुरज लोळगे, महादेव बटुळे व अन्य भाजपा कार्यकर्त्यात शाब्दीक चकमक उडाली, प्रकरण ठाण्यापर्यंत गेले पुढे वाद मिटला की दाखल झाला हे कळले नाही. स्थानिक प्रशासनाने शहरात सुरु असलेल्या राजकीय प्रचाराची दखल घ्यावी, नाथषष्ठीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांची फोटो असलेली बॅनरर्स पोस्टर्स शहरात झळकली होती, यात काहींनी परवाणगी काढली तर काही अनाधिकृत पण होती अश्या बॅनर पोस्टर्स असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.