Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

आनंदा’च्या शिधा वाटपाला आचारसंहितेचा ’ब्रेक

Responsive Ad Here
लातूर प्रतिनिधी सगीर मोमीन राज्य शासनाने राज्यात सर्वत्र रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप दर महिन्याला सुरू केले. २१ जानेवारीला ‘रामलल्ला’ची अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वच महिन्याला आनंदाचा शिधा वाटपाचा धोरण राज्य शासनाने अवलंबिले होते. शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले आहे.यंदा दिवाळीपूर्वीच आनंदाचा शिधा मिळाला होता. त्यानंतर येणाऱ्या सणापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची योजना होती. सोबतच बीपीएल कार्ड धारकांना प्रती कार्ड एक साडी देण्याचे, दोन पिशव्या देण्याचे नियोजन होते. काहींनी साडी, पिशव्या देणे सूरू केले होते. तर काहींच्या रेशनदुकारांनावर साड्या, पिशव्या येणे बाकी होते.आचारसंहितेची घोषणा होताच आनंदाचा शिधा, साडी, पिशव्या रेशनदुकानांतून देणे बंद करण्यात आले आहे. तसे आदेशच शासनाने काढले आहे. पंतप्रधानांची प्रतिमा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत होता. मात्र शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधा ज्यात दिला जात त्या पिशवीवर पंतप्रधानांचे छायाचित्र असल्याने हा विषय आचारसंहितेत बसणारा नाही. त्यामुळे आचारसंहिता लागू होताच शिधा वाटप बंद झाले आहे.