Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

शेळगाव शिवारात अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले,७ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त

Responsive Ad Here
सोनपेठ/परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव रोडवर सोनपेठ पोलीसांनी अवैध वाळूची दोन ट्रॅक्टरने वाहतूक करतांना हे दोन्ही ट्रॅक्टर पोलीसांनी दि.७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सदरील वाळूचे ट्रॅक्टर पकडले.या ट्रॅक्टरसह एकुण ७ लाख ९२ हजार किंमतचा मुद्देमाल जप्त केला. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव शिवारातील गोदावरी नदीवर अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरने वाळूची विक्री करण्यासाठी शेळगाव रोडने सदरील दोन्ही ट्रॅक्टर जात होते.दरम्यान सोनपेठ पोलीस ठाण्याचे अंमलदार परमेश्वर मंत्री शेळगाव रोडवरील शासकीय दवाखान्याजवळ पेट्रोलींग करत असतांना अवैध वाळूचे ट्रॅक्टर जातांना दिसले.त्यांनी या ट्रॅक्टर चालकांना हात दाखवुन ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले. त्यानंतर चालकाची चौकशी केली असता गोदावरी पात्रातुन अवैध वाळू भरून विक्रीला जात असल्याचे समजले.या ट्रॅक्टर चालकांना सदरील ट्रॅक्टर सोनपेठ पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले.ट्रॅक्टर चालकांनी दोन्ही ट्राँक्टर सोनपेठ पोलीस ठाण्यात आणले.त्यानंतर या दोन्ही अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले.जप्त केलेल्या वाळूची व ट्रॅक्टर दोन्ही मिळून अंदाजे रक्कम ७ लाख ९२हजार आहे.या प्रकरणी पोलीस अंमलदार परमेश्वर मंत्री यांच्या तक्रारीवरून सुरज धायगुडे राहणार घोडा कौडगाव तालुका परळी जि.बिड, गोरख पतंगे राहणार धारासुर तालुका गंगाखेड यांच्यावर अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. ही कार्यवाही उपविभागिय पोलिस आधिकारी डाँक्टर दिलिप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आमंलदार लक्ष्मण कांबळे, परमेश्वर मंत्री,गजेद्र चव्हाण,संदिप गित्ते,हनुमंत पौळ या पोलिस पथकांनी केली..