Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
संत एकनाथषष्टी निमित्त पैठण येथे आलेल्या भाविक भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जमाते इस्लामी हिंद तर्फे मोफत पाणपोई व इस्लाम दर्शन केंद्राची व्यवस्था
Responsive Ad Here
पैठण /औरंगाबाद प्रतिनिधी सुनील अडसूळ
पैठण:- जमाते इस्लामी हिन्द पैठण च्या वतीने भर उन्हाळ्यात स्वतः रोजा/उपास ठेवून दोन दिवस भाविकांची तहान भागविण्याचे पुण्य काम जमाते इस्लामी हिन्द पैठण चे सदस्यांनी केलं. एकमेका बद्दल असलेले गैरसमज दूर होऊन धार्मिक सलोखा वाढावा व खरा इस्लाम धर्म लोकांना माहीत व्हावा, यासाठी धार्मिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
सदरील उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. उन्हाळा असल्यामुळे दर दहा मिनिटाला एक जार संपत होते. पैठणचे तहसीलदार मा. सारंग चव्हाण साहेब व पोलीस निरीक्षक मा. देशमुख साहेब यांनी पानपोईला भेट देऊन खूप कौतुक केले.कार्यक्रमाची सांगता इफ्तार पार्टी ने झाली ज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला. अहमद नगरहून आलेले सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. रफिक पारनेरकर( (सदस्य संदेश विभाग जमाते इस्लामी हिन्द महाराष्ट्र प्रदेश), यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. रफ़ीक़ पारनेरकर यांनी सांगितले की केवळ खानपान सोडणे म्हणजे रोजा नाही तर हात,पाय, डोळे,कान, विचार यांना वाईट कृत्या पासून रोखणे हा देखील रोज्याचा भाग आहे. अन्न पाणी ना मिळाल्याने गरिबांचे कसे हाल होतात याची जाणीव निर्माण होऊन प्रत्येकाने त्यांना दान धर्म करणे हा रोजा मागचा उद्देश आहे असे प्रतिपादन केले. समारोपीय कार्यक्रमात डॉ. पंडित किल्लारीकर, रामावत सर, ऍड. प्रताप वाकडे, ऍड. ऑटे, यश आहुजा, ऍड. रमेश गव्हाणे, ऍड. पांडुरे, मोतीलाल घुंगासे,नन्द किशोर मगरे, सरदारजी तसेच विविध समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झाकीर शेख(अध्यक्ष जमाते इस्लामी हिन्द पैठण),एड.इमरान शेख(सचिव जमाते इस्लामी हिन्द पैठण) आमेर मलिक(अध्यक्ष यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द पैठण), हुझेफ बोहरी(सचिव जमाते इस्लामी हिन्द पैठण), फैसल यमिन, आरिफ कुरेशी, मो. चाऊस, राजू कटयारे, चांद पाशा भाई, ,मुक़ीम कटयारे, सरफ़राज़ शेख,तालेब गिराम,अज्जू कट्यारे, हस्नैन भाई क़ादरी, वसीम कादरी, हमीद खान सर,रवी जमधडे, स. अहमद अली, फैजान मोरवे, यांनी खूप परिश्रम घेतले.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420