Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

शाळा बंद होतात मुले रमली मोबाईलवर..आबालवृद्धांपासून तर महिला पर्यंत सर्वांनाच मोबाईलने लावले वेड..

Responsive Ad Here
केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ
यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील सद्यस्थिती जवळपास सर्व शाळांना सुट्टी लागल्याने मुले घरीच आहेत दुपारी उन्हाच्या तीव्रता असल्याने बाहेर जाणे जवळपास बंद झाले आहे सतत घरात राहिल्याने लहान मुले व युवा पिढीला मोबाईलचे मोठे वेड लागले असून दिवसभर मुले मोबाईलवर राहत असल्याचे चित्र जवळपास सर्वच घरी पाहायला मिळते पूर्वीच्या काळात विद्यार्थी मित्र जमायचे गप्पागोष्टी चालायच्या, मैदानी खेळ खेळायचे मात्र आता खेळणे बागडणे बंदच झाल्याचे दिसून येते, मोबाईलच्या अति वापरामुळे डोळ्यावर विपरीत परिणाम होऊन बऱ्याच जणांचे चष्म्याचे नंबर वाढलेले दिसून येतात सतत मोबाईलवर असल्याने डोळ्यासोबतच मानाचे पाठीचे व कमरेचे आजार सुद्धा वाढण्याचे दिसून येते शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण परिसरातही इंस्टाग्राम चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे सर्वांना मोबाईलची सवय जडलेली दिसून येते पूर्वी टू जी थ्री जी होते पण आता फोर जी फाईव्ह जी जमाना आला सतत मोबाईलचा वापर होत असल्याने अनेकांना दीड जीबीचा डेटा सुद्धा तू येणार असा झाला सोशल मीडियावर येणारे युट्युब वरील प्रोग्राम रिल्स चित्रपट गाणी यांचा अति वापरामुळे टू जीबी डेटा सुद्धा पुरत नसल्याचे दिसून येते याशिवाय व्हाट्सअप,फेसबुक,टिटर इंस्टाग्राम आधीपासून सुद्धा वापर वाढल्याचे दिसून येते कित्येक जण दिवसभर केवळ बनवताना दिसून येतात यामध्ये वेळेचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे पूर्वी टाईम इज मनी असे म्हटले जायचे मात्र आता महिला व पुरुष सर्वच तासन तास मोबाईलवर दिसून येतात स्वतःच्या रील्स तयार करून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यापर्यंत इंस्टाग्राम ची सर्वाधिक गरज भासवते निमंत्रण पत्रिका पासून तर तेरवीच्या जेवणाचे आमंत्रण सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून होते लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराकरिता सर्वाधिक वापर सोशल मीडियाचा करण्यात आला सर्वच उमेदवारांनी व गाव पूढार्‍यांनी सोशल मीडियाचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता..!