Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
काल्याची दहीहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता...आम्ही जातो आमुच्या गावा" आमुचा राम राम घ्यावा",वारकरी लागले परतीच्या मार्गाला.
Responsive Ad Here
*काल्याची दहीहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता...*
"आम्ही जातो आमुच्या गावा" आमुचा राम राम घ्यावा", वारकरी लागले परतीच्या मार्गाला.....*
पैठण प्रतिनिधी सुनील आडसुल
भानुदास एकनाथाच्या जयघोषाणे अवघी दुमदूमली प्रतिष्ठान नगरी, मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन कालाष्टमीची दहीहंडी फोडून पैठणच्या नाथषष्ठीची सांगता झाली.
टाळ मृदंगाच्या निनादात, भानुदास एकनाथच्या जयघोषात तल्लीन होऊन मावळतिच्या सूर्याला साक्षी ठेऊन नाथांचे तेरावे वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी हजारो भक्तांच्या उपस्थितीत काल सायंकाळी काल्याची दहीहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता केली.
गेल्या तीन दिवसापासून शहरात टाळ मृदंगाचा निनाद व भानुदास एकनाथचा जयघोष सुरू होता.
लाखोंच्या संख्येने वारकरी शहरात दाखल झाले होते, त्या भक्तिमय सोहळ्याचा आज समारोप झाला, जड अंतकरणाने वारकऱ्यांनी नाथांचा निरोप घेत, आम्ही जातो आमच्या गावा" आमचा राम राम घ्यावा, म्हणत वारकरी परतीच्या मार्गाला लागले.
सप्तमीला दिंड्या नाथनगरीत मुक्काम करून अष्ट्मीला कालाष्टमीला काल्याचे कीर्तन करून दहीहंडी चा प्रसाद घेऊन परतीच्या मार्गाला लागतात त्यामुळे सोमवारी सकाळ पासून दिंड्या आपोआपल्या फडात काल्याचे कीर्तन करून बरेचसे दिंडी प्रमुख ह.भ.प. महाराज परतीच्या मार्गाला लागले, त्यामुळे दुपार पर्यंत दिंड्या विसावलेले वाळवंट मोकळे झालेले दिसून आले.
नाथषष्ठीसाठी 5 लाखापेक्षा जास्त भाविकांची हजेरी.*
महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातुन येऊन मुक्कामी थांबलेल्या दिंड्यांच्या फडावर दोन दिवसात किमान 5 ते 6 लाख भाविकांनी नाथषष्ठी यात्रेला हजेरी लावली.
दोन दिवसापासून गोदावरीच्या वाळवंटात भजन कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. यामध्ये अध्यात्म क्षेत्रातील संत, महाराज संतांच्या जीवनाचे मर्म समजावून सांगत प्रबोधन करत होते.
सगळीकडे भानुदास एकनाथ, ज्ञानबा तुकाराम व दत्तात्रय... जनार्धन श्री एकनाथ महाराज की जय अशा आवाजाचा निनाद शहरात ऐकू येत होता.
सायंकाळी नाथसमाधी समोर टांगलेली दहीहंडी नाथवंशज यांच्या हस्ते फोडण्यात आली,
व बाहेरील दुसरी दहीहंडी वारकऱ्याच्या हस्ते फोडून ४२५ व्या नाथषष्ठी सोहळ्याची सांगता झाली.
नाथ मंदिरातील दहीहंडीसाठी दत्ता भाऊ गोर्डे, कल्याण काळे, अनिल पटेल, विनोद तांबे, ज्ञानेश्वर कापसे,
संजय वाघचौरे सह अनेकांची उपस्थिती होती.
*नाथसंस्थानच्या वतीने साजरी होणारी वारकऱ्यांची काला दहीहंडी मंदिराच्या बाहेर डोम मध्ये फोडण्यात आली.या कालाहंडीस प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून, ही काला दहीहंडी मंदिराच्या बाहेरून मुख्यप्रवेश द्वाराजवळ फोडण्यात आली, यावेळी बाहेरील काला दहीहंडीस शहारासह ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी होती.
नाथषष्ठी सोहळ्याच्या सांगता प्रसंगी
रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा नाथसंस्थान चे अध्यक्ष संदीपान पाटील भुमरे हे बाहेरील नाथसंस्थान च्या काला दहीहंडी फोडण्यासाठी उपस्थित होते ही दहीहंडी वारकऱ्याच्या हस्ते फोडण्यात आली.
या दहीहंडीसाठी नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, नंदू आण्णा काळे, बाबुराव पडुळे, विनोद बोंबले आदीसह अनेकांची उपस्थिती होती*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420