Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
बोरी खुर्द येथे पंचशील ध्वजाची विटंबना,बौद्ध समाज बांधव आक्रमक,रास्ता रोकोद्वारे निषेध*
Responsive Ad Here
*घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त परिस्थिती नियंत्रण मध्ये*
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
पुसद तालुक्यातील बोरी खुर्द येथे, रात्री अवकाळी झालेल्या पावसाचा फायदा घेऊन गावातील जातीवादी लोकांनी जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले पंचशील व निळे ध्वज उकडून कॅनॉल मध्ये फेकून दिले ही घटना काल दिनांक, 9 एप्रिल 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
आज सकाळी गावातील बौद्ध समाज बांधव व महिला यांच्या लक्षात आले की पंचशील ध्वज व निळे ध्वज पाण्यात फेकून दिल्याने पंचशील व निळ्या ध्वजाची विटंबना करण्यात आली हे लक्षात येताच गावातील बौद्ध समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत एकत्र जमा झाले निषेध नोंदविण्यात आला. युवक व महिलांनी आक्रमक होऊन पुसद ते नांदेड व पुसद ते हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ता पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होऊन समाज बांधवांना शांततेचे आवाहन केले व या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर व कठोर कार्यवाही करण्यात यावी असे आव्हानहि या प्रसंगी करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाचे
पोलीस उपविभागीय
अधिकारी, पंकज अतुलकर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर
पोलिसांचा फौज फाटा घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या संपूर्ण परिस्थितीवर पोलिस प्रशासनाचे लक्ष असून घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.
यावेळी भीमा टायगर सेना सामाजिक संघटनेचे किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव, प्रज्ञा पर्व समितीचे कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे सामाजिक कार्यकर्ता सुरेश कांबळे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ता पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420