Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

भोसा रेती घाटावर अंधा धुंद फायरिंग करणाऱ्या आरोपीस गावठी कट्ट्यासह अटक!

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ*
दिनांक 28/ मार्च 2024 रोजी रात्री 10 वाजण्याचे सुमारांस मौजे भोसा ता. महागांव येथे रेती घाटावर यांतील आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी व त्याचे इतर 20 ते 25 साथीदार असे तिन गाडयासह रेती घाटावर येवून रेती घाटचा रस्ता वापरण्याचे कारणावरुन शिवीगाळी, धमकी देत असतांना त्यांना साक्षीदार यांनी विरोध केला असता त्याचा मनात राग धरुन फिर्यादी व साक्षीदार यांना जिवेमारण्याचे उददेशाने गावठी कटटया मधून अंधाधूंद फायरिंग करुन दहशत निर्माण करुन तेथील गाडयाची तोडफोड करुन पळून गेले म्हणून पोलीस स्टेशन महागांव अप क्रमांक 264/2024 कलम 307, 143, 144, 147, 148, 149, 341, 324, 504, 506, भादवि सह कलम 3, 35 भाहका सह महा पो अधि कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यास तात्काळ अटक करण्याकरीता मा. वरिष्ठांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या होत्या. दिनांक 30/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असतांना मुख्य फरार आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी हा कासोळा ते काळी (दौ) रोडवरील मोरवाडी फाटा परिसरात दबा धरुन असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने नमूद खालील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आरोपी शोध कामी कासोळा व काळी (दौ) परिसरात रवाना झाले असता कासोळा ते काळी (दौ) रोडवर मोरवाडी फाटा परिसरात आरोपी शोध घेत असतांना मोरवाडी फाटा परिसरात मुख्य आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी वय 21 वर्षे, रा.वडसा ता.माहूर जि. नांदेड हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल (कटटा) मिळून आला असून सदरचा देशी कटटयामधून भोसा रेती घाटावर फायरिंग केली असल्याचे सांगितल्याने मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता महागांव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोनि आधारसिंग सोनोने स्थागुशा यवतमाळ, सपोनि, गजानन गजभारे, स्थागुशा यवतमाळ, पोउपनिरी/शरद लोहकरे, चापोउपनि रेवन जागृत, चापोउपनिरी/रविंद्र श्रीरामे, पोहवा/ तेजाब रंणखांब, पोहवा/ सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि मोहम्मद ताज, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ