Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

चक्क ग्रामीण पोलीस ठाण्यातून पळालेला आरोपी, खडकदरी परिसरात झाला जेरबंद!

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारला रोडवरील ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून बलात्काराचा आरोप असलेला आरोपी दिलीप उर्फ संजय पठाडे वय ३५ वर्ष रा. नांदुरा ता. पुसद दि.२९ मार्च च्या सायंकाळ दरम्यान लॉकअप गार्डच्या हाताला झटका देऊन सदर आरोपी फरार झाल्याची खळबळ जनक घटना घडली. गामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध कमांक ५९५/२०२२ कलम ३६३, ३७६ (३), ३४ भादवी सहकलम ३, ४ पोक्सो मध्ये दि. २९ मार्च रोजी अटक करून त्याला विद्यमान न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याचा दि. ३० मार्च पर्यंत आरोपीस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती. त्याला परत ग्रामीण पोलीस ठाण्यात आल्यानंतर लॉकअप मध्ये बंद करीत असताना गार्ड ड्युटीवर हजर असलेले पोलीस जमादार प्रकाश चव्हाण यांच्या हाताला आरोपीने झटका माखून पळून गेला. सदर घटनेने संपूर्ण ग्रामीण पोलीस ठाणे हादरले होते. घटनेचे गांभीर्य बघत वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम २२४ भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस सदर आरोपीचा युद्ध पातळीवर तपास सुरु केला. रात्रभर सदर आरोपीचा शोध ग्रामीण पोलीस परिसरात घेत असताना दि. ३० मार्च 'च्या पहाटे तालुक्यातील खडकदरी परिसरातील शेत शिवारात सदर आरोपी पोलिसांना सापडला. त्याला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, पीएसआय भांबुरकर, एएसआय शेख मकसूद, 'पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे, धम्मानंद केवटे, पवन गादेकर, 'एएसआय बहादुरे, चंदन जाधव, प्रकाश चव्हाण, श्याम घुगे, गजानन फोपसे, अविनाश मिसे, सुभाष चिरमाडे, इंदल आडे, पुंडलिक वानखेडे, राजू इरस्ते, शेख दानिश, दीपक वाघमारे, संदीप राठोड, प्रसन्जीत भवरे यांनी सदरची कारवाई पार पाडली. तपासकामी बारी (मच्छिंद्रनाथ) चे पोलीस पाटील बाळासाहेब खरात व बोरगडी गावचे पोलीस पाटील नामदेव ढगे यांनी पोलिसांना खूप मोठे सहकार्य केले. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचायांच्या बलात्काराच्या आरोपात अटक असलेल्या आरोपी ठाण्यातील लॉकअप मधून पळून गेल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य निष्ठेचे धिंडवडे निघाले. नशीब बलात्काराच्या आरोपातील पळून गेलेला आरोपीस पुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ३० मार्च रोजी पहाटे खडक दरी परिसरातुन अटक केली. त्यामुळे पोलिसांची गेलेली ह लगजीपणामुळे इब्रत साबूत राहिली..