Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर,जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन
Responsive Ad Here
पूर्णा/परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर
लोकसभा - 2019 मध्ये 60 टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमधून मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व मा. तहसीलदार पूर्णा तसेच स्वीपपथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा तालुक्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पूर्णा तालुक्यामध्ये प्रभात फेरी, मोटरसायकल रॅली, चुनाव पाठशाला, मतदान साक्षरता क्लब, युवा संवाद, रिल्स स्पर्धा, उद्घोषणा आवाहन, मॉर्निंग क्लबला भेटी, योगा क्लब येथे भेटी, पालकांना विद्यार्थ्यांना मार्फत संकल्पपत्रे देणे, भजनी मंडळ, धार्मिक मंदिरे- मज्जिद - विहार - चर्च येथील प्रमुख यांच्या भेटी व लाऊडस्पीकरवरून आवाहन करणे, रांगोळी स्पर्धा, कलापथक, आडत व्यापारी संघटना इतर विविध गट सामाजिक सेवा संस्था भेटी,महिला बचत गट यांच्या भेटी घेऊन टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्वीप 97 गंगाखेडचे पथक प्रमुख श्री. युवराज पौळ व गटशिक्षणाधिकारी मारुती सूर्यवंशी यांनी याबाबत नियोजन केले आहे. सदरील नियोजन यशस्वी करण्यासाठी स्वीप पथकातील डॉ. दिलीप शृंगारपुतळे, श्यामसुंदर मोकमोड, आनंद कांबळे, संजय कांबळे, केंद्रप्रमुख ए.टी.खिल्लारे आदी सर्वजण परिश्रम घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून व लोकांच्या प्रतिसादावरून यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे टक्केवारी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420