Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

देवणी तालुक्यातील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा

Responsive Ad Here
लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन*
देवणी तालुक्यातील बहुतांश भागात सोमवारी दी. 22 एप्रिल दुपारी चारनंतर वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात फळांचा राजा आंबा या फळ पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली असून या पिकावरच अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे परंतु मागेही अनेक वेळा वादळ वारा होऊन आणि वातावरणातील विविध बदलामुळे आंबा या पिकावर सतत समस्यांची संक्रात येत असतानाच सोमवारी झालेल्या या जोरदार विजेच्या कडकडाट वादळामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच अनेक भागात वीज पुरवठा ठप्प झाला होता. तालुक्यात सोमवारी दुपारपर्यंत उन्ह होते. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होऊन वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पावसास सुरवात झाली. तालुक्यातील दवणहिप्परगा तळेगाव गुरनाळ, बोंबळी खुर्द व बोंबळी बुद्रुक यासह अनेक गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. मात्र सोमवारी झालेल्या वादळामुळे धार्मिक कार्यक्रमात मोठा व्यत्यय आला. दुपारच्या सत्रातील धार्मिक कार्यक्रम रद्द करावे लागले. धार्मिक कार्यक्रमासाठी टाकण्यात आलेल्या मंडपाचे मोठे नुकसान झाले. याशिवाय वलांडी, धनेगाव, बोंबळी, कवठाळा भागात वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. संसारोपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. शिवाय काढणीला आलेली ज्वारी, कडबा सोयाबीनची गुळी भिजल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर टरबूज, पपई, केळी, आंबा या बागांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश भागात शेतीच्या आंतरमशागतीची कामे सुरू असून पावसाळी वातावरणामुळे ती बंद करावी लागली आहेत