Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
नाशिकमध्ये वंचिततर्फे करण गायकर उमेदवारी जाहिर
Responsive Ad Here
नाशिक :-वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघात सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवले आहे. तर महायुतीच्या उमेदवारीचा घोळ अजूनही कायम आहे. विकास आघाडीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. मराठा सकल मराठा आंदोलनातील एक तरुण चेहरा, स्वराज्य पार्टी, क्रांतिवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,सकल मराठा समाज राज्य समन्वयक असलेले करण गायकर यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेतली होती. त्यावेळी नाशिक लोकसभेच्या जागेबाबत सखोल चर्चा झाली होती. वंचिततर्फे करण गायकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्याची अधिकृत घोषणा पक्षातर्फे करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या लढ्यासह विविध आंदोलनात गायकर हे सक्रिय होते. उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका येथील राजयोग हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव वामन गायकवाड, राज्य युवक राज्य कमिटीचे सदस्य चेतन गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष पवन पवार,महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांजसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार करण गायकर,दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमती मालती थवील यांचा जाहीर प्रवेश करून घेतला व पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने त्यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्याचे घोषित केले..
महाविकास आघाडीप्रमाणे महायुती मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. हे लक्षात घेऊन वंचितनेही मराठा समाजाच्या व्यक्तीला मैदानात उतरवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एक लाख नऊ हजार ९८१ अर्थात ९.८ टक्के मते मिळवली होती. यावेळी मराठा आंदोलनातील सक्रिय उमेदवाराला उमेदवारी देऊन वंचितने लढत चुरशीची करण्याचे नियोजन केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नाशिक मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होते की बहुरंगी होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर,दिंडोरी उमेदवार मालती थवील,जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगरप्रमुख अविनाश शिंदे,सचिव वामन गायकवाड युवक प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, युवक महानगरप्रमुख रवी पगारे, बाळासाहेब शिंदे, दिपक पगारे,शिवा तेलंग, विजय वाव्हळे, किरण डोके,डॉ. अनिल आठवले, बजरंग शिंदे,कोमल पगारे, माहीर गजवे, ऍड भारत बुकाने, जितेश शार्दूल, विवेक तांबे,राहुल पटेकर, दादासाहेब शिरसाठ, विक्की वाकळे,राजू गोतिस,शरद सोनवणे, संतोष वाघ आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420