Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पूर्णेच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडले जिवघेणे खड्डे
Responsive Ad Here
पूर्णा परभणी प्रतिनिधी सलीम सय्यद सुहागनकर
पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर संगम रवरी फर्च्या फुटून भला मोठे खोल खड्डा पडला आहे .येथून रेल्वेने असंख्य रेल्वे दररोज धावत असतात तसेच प्रवास करणा-यांची संख्या लक्षणीय असुन भला मोठा खड्डा पडल्याने रेल्वे गाडीत चढणे उतरणे प्रवाशांना जीव घेणे झाले आहे प्लॅटफॉर्म क्रमांक २-३ वरील लोहमार्गावर अनेक प्रवाशी रेल्वे गाड्या थांबतात. प्लॅटफॉर्म वर गेल्या काही दिवसापासून खड्डे पडले तसेच काही फरशा या मोकळ्या झाल्या असल्यामुळे प्रवाशांचा या खड्यात पाय जावून फ्याक्चर होण्याची शक्यता आहे.याकडे या गंभीर प्रश्नाकडे संबधीत पूर्णा रेल्वे विभागाचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील दादरा शिडीच्या पाय-या देखील फुटून लोखंडी ऐंगल बाहेर निघालेत त्यात प्रवाशांचा पाय अडकवून मोडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसर व प्लॅटफॉर्मवर अस्वच्छता असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे तसेच रेल्वे स्थानक परिसरातील वेटिंग हॉल येथे स्वच्छालयातील लाईट मात्र मागील बऱ्याच महिन्यांपासून बंद असून आय डब्ल्यू अधिकारी आणि कंत्राटदार यांचे आर्थिक संगणमत असल्याचे प्रवास शिवरगांमधून चर्चा होत आहे याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत प्रवाशांना मात्र याचा नाहक होत आहे पूर्णा येथील संबंधित रेल्वे अधिकारी या सर्व सुविधेकडे लक्ष देत नाहीत.या प्रकाराकडे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी रेल्वे प्रवाशी वर्गातून होत आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420