Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
जागतिकि करणाने वंचितांचे प्रश्न निर्माण झाले आहे-आंबेडकरी साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
जागतिकीकरणाने जग हे स्पर्धेवर ठेवले आहे.या स्पर्धेत भाग घेण्याचे स्वातंत्र्य आहे.मात्र या स्पर्धेने एक हरणाऱ्यांचे व दुसरे जिंकणाऱ्यांचे जग तयार झाले आहे.हे विषम व्यवस्थेवर आधारलेले आहे.भारत देशात एकीकडे अन्नधान्य फुकट देण्याची वेळ आली आहे .तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे.अशा परिस्थितीत भारत महागुरु कसा ? असा सवाल करत जागतिकीकरणामुळे वंचितांचे प्रश्न निर्माण झाले आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
सम्राट अशोक, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन रविवार ७ एप्रिल रोजी आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी बीज भाषण करताना उत्तम कांबळे बोलत होते.उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भीमराव कांबळे होते.मंचावर प्रा. कल्याण साखरकर,अर्जुनराव लोखंडे,प्रशांत वंजारी,गजानन जाधव,शांतीकुमार इंगोले व आयोजन समितीचे अध्यक्ष अर्जुन भगत उपस्थित होते.
सुरुवातीला गौतम बुद्ध,डॉ. आंबेडकर यांच्यासह महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुजाता महिला मंडळांनी बुद्ध वंदना सादर केली. समितीचे अध्यक्ष अर्जुन भगत,कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे यांनी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जागतिकीकरणामुळे वंचितांची वाट कशी बिकट झाली,याबद्दल उत्तम कांबळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून नेमके विश्लेषण केले.
ते म्हणाले की,1990 ला जागतिकीकरण सुरू झाले.मात्र आपल्याकडे ते अनेकांना कळलेच नाही. हे जग अनित्य आहे.जगात कायमस्वरूपी काहीच नाही.बुद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार जो बदल स्वीकारतो तो टिकून राहतो.विचारांचा जागर क्रांती घडवू शकते,हे सांगताना त्यांनी भांडवलशाहीला नफा कमविण्यासाठी जागतिकीकरणातून मार्ग मोकळा झाला.भांडवलशाही युद्धाला नेहमी प्रोत्साहन देते,असे त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी राखीव जागा निर्माण केल्या. राखीव जागा म्हणजे
कल्याणकारी राष्ट्राकडे जाणारे पाऊल होते,आज मात्र राखीव जागांचा उद्देश लक्षात न घेता राखीव जागा मागण्याचा काळ सुरू झाला,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.त्यांनी आपल्या भाषणातून सध्याच्या शिक्षण पद्धतीवर टीका केली.खाजगी शाळातून महागडे शिक्षण दिले जाते.त्यातून चांगले करिअर मिळविता येते.दुसरीकडे मोफत शिक्षणातून चांगले विद्यार्थी का घडत नाही,याला जबाबदार कोण? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी .शेषनागच्याा फण्याभोवती पृथ्वी फिरते ही अंधश्रद्धेवर आधारित थिअरी खोटी ठरवली.आपल्या हातात पुस्तक असेल तर मोठा मानमरताब भेटतो.पुस्तक मस्तकात गेले तर क्रांती घडते.डॉ. बाबासाहेबांनी संविधान हातात देऊन लोकांच्या काळजात पृथ्वी कोरली,असे सांगताच श्रोत्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.जग बदलणाची धमक ठेवणाऱ्या बाबासाहेबांनी सर्व जातींच्या हिताचा विचार केला,असे सांगत त्यांनी बाबासाहेबांची जयंती अखंड समाजाची व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन गवई यांनी केले .बाबाराव उबाळे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे यशस्वीसाठी धम्मक्रांती प्रज्ञा पर्वाचे अध्यक्ष अर्जुन भगत. कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे.सचिव शरद ढेंबरे. उपाध्यक्ष विजय निखाते. ल.पु. कांबळे बाबाराव उबाळे. मिलिंद जाधव. आर.पी. गवई. प्रफुल भालेराव. प्रमोद धुळे. निर्भय गायकवाड. राहुल पाईकराव. बाळासाहेब कांबळे. संदीप कावळे. सुरेश कांबळे. प्रमोद धुळे. दौलत हाडसे. मधुकर सोनुने. अंबादास कांबळे. आनंद खडसे. यांच्यासह समितीचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
दिनांक 9 एप्रिल रोजी लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबांमुळे तुझ्यान माझ्या घरात
मंजुषा शिंदे यांचा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर पुसद येथे होणार आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420