Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
अखेर नाशिकचा तिढा सुटला, शिंदे गटाच्या शिवसेनेला जागा सुटली, विद्यमान खा.हेमंत गोडसे यांनाच तिसऱ्यांदा दिली संधी
Responsive Ad Here
नाशिक :-राज्यात गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून नाशिकची जागा आपल्या पदरात पाडण्यात शिवसेनेला यश आले आहे. नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता, त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही या जागेवर दावा केला होता. मात्र, काही केल्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवरील आपला दावा सोडत असल्याचे जाहीर केले होते. याबाबत महत्वाची बाब म्हणजे बुधवारी भाजपा नेते गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड 1 तास चर्चा झाली. त्यानंतर, नाशिक लोकसभेसाठी आज महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. अखेर विद्यमान खासदार शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत झालेल्या खलबतानंतर अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचा आग्रह डावलून नाशिक स्वतःकडे खेचण्यात मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे, आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत रंगणार आहे. त्यातच अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांची देखील एक प्रचारफेरी केली पूर्ण झालेली असून माजी खासदार हेमंत गोडसे यांना विजय खेचून आणण्यासाठी मोठी कसरत करावा लागणार आहे, तसं पाहिलं तर नाशिकची ही लढत चौरंगी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बोलली जात आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420