Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
अहो नाही महावितरण भानावर.. तर जनता उतरणार रस्त्यावर..
Responsive Ad Here
*यवतमाळ येथे जन आक्रोश संघर्ष समितीचे महावितरणला निवेदन..!*
केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ*
यवतमाळ येथे 25 मे रोजी सकाळी 11 वाजता यवतमाळकर वीज जन आक्रोश संघर्ष समितीच्या वतीने महावितरणाचे उपविभागीय अभियंता श्री.राऊत यांना महावितरण कार्यालय यवतमाळ येथे विनंती वजा इशाऱ्यातून निवेदन देण्यात आले, सदोष अश्या तांत्रिक बाबी, कर्मचाऱ्यांची कमतरता,अस्थायी स्वरूपाचे अधिकारी असल्यामुळे नागरिकांना सतत व अखंड वीजपुरवठा होत नाही त्यामुळे अनेक वर्गातील जसे छोटे-मोठे दुकानदार लहान मुले,ज्येष्ठ महिला वर्गाना या खंडीत वीज पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे नेमके लाईट गेल्यानंतर चोर संधी साधून चोरीचे प्रमाण वाढले आहे, 42 डिग्री सेल्फी अस तापमानामध्ये रात्री बे रात्री जाणाऱ्या विजे मुळे लहान मुले व वृद्ध उष्माघाताने आजारी पडत आहेत उपविभागीय अभियंता राऊत यांनी येत्या शनिवार,रविवार व सोमवार या तीन दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे निवेदनकर्त्याच्या वतीने पुन्हा मंगळवार सुद्धा त्यांना दिला असून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या बुधवारी वीज ग्राहक यवतमाळकर नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारून कॅण्डल मोर्चाचे आयोजन करतील असे सांगण्यात आले निवेदन देताना यवतमाळकर वीज आक्रोश संघर्ष समितीचे संयोजक प्रलय टिप्रमवार अनिल हमदापुरे राजेंद्र गावंडे राजू टेकाळे ललित गजभिये विनोद दोदल महादेव काचोरे सुनील संकोचवार व इतरही यवतमाळकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420