Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
चार्वाक वन येथे हर्ष उल्हासात बुद्ध जयंती साजरी,राष्ट्रीय संविधान हक्क परिषदेचे, उमेश मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ*
जगाला शांतीचा संदेश देणारे जागतिक शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती, चार्वाक वन येथे प्रचंड हर्षोल्हासात संपन्न झाली.
बुद्धमूर्तीचा परिसर विजेच्या दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आला होता.
सकाळी नित्याप्रमाणे वंदना झाली आणि सायंकाळी प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रबोधन सत्राला राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषदचे संस्थापक अध्यक्ष उमेश मेश्राम यांचे प्रमुख मार्गदर्शन पर प्रबोधन झाले.
कितीही विद्वान वक्त्याचे भाषण आयोजित केले तरी, सांगितलेली बौद्धधम्म तत्वे अल्पकाळच लक्षात राहतात त्याला चिरत्व यावे आणि बौद्धधम्म जनसामान्या पर्यंत जावा म्हणून बौद्धधम्म प्रचार पत्रिका प्रकाशित करून वितरीत करण्यात येते. सन.२०२४ च्या बौद्धधम्म प्रचार पत्रिकेचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले हि पत्रिका उपस्थित असलेल्या सर्वांना वितरीत करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी पोलीस अधिकारी आनंद भगत,संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष सुधीर देशमुख दलित मित्र पुरस्कार प्राप्त .एस.टी.भगत
नारायणराव क्षीरसागर, जि.प चे.माजी शिक्षण सभापती बी.जी..राठोड पुसद न.प.चे माजी उपाध्यक्ष तायरखान पठाण, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राजेश ढोले, पत्रकार कैलास श्रावणे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
विदर्भात प्रचंड उष्णता तसेच अवकाळी पावसाचे वादळी वातावरण असले तरी उपस्थिती मात्र नेहमी प्रमाणे बहुसंख्य होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक म.फुले समता मंचचे विश्वस्त गोवर्धन मोहिते यांनी तर संचलन यशवंतराव देशमुख यांनी केले..
चार्वाक वनाचे संस्थापक अॕड.अप्पाराव मैंद यांच्या आभार प्रदर्शनाने जयंती कार्यक्रमाची सांगता झाली.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420