Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

वंचितचे उमेदवार करण गायकर ध्वजाला विजयाचा गुलाल लावणार?

Responsive Ad Here
*वंचित बहुजन आघाडीचे नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन*
नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि मालती थविल यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही उमेदवार शहरातील बी डी भालेकर मैदान, शालीमार, नेहरु गार्डन, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालाय या परिसारातून भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार महानगरप्रमुख अविनाश शिंदे,उत्तर महाराष्ट्र सचिव वामन गायकवाड, युवक राज्य कमिटी सदस्य चेतन गांगुर्डे, दीपचंद दोंदे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड युवक शहराध्यक्ष रवी पगारे,छावा संघटनेचे आशिष हिरे,शिवा तेलंग, विजय वाव्हळे, बजरंग शिंदे,कविता गायकर,पंडित नेटावटे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी करण गायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं असल्याचं त्यांनी नमुद केलं. पुढे ते म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणुक लढवणार आहोत. या जिल्ह्यात शेती, कामगार, विकास, सहकार, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, पर्यावरणाचे असे विविध प्रश्न आहेत. आम्हाला विकासावर बोलायचय विकासावरच लढायचं आहे. ते टीका टिप्पणी त्यांच काम आहे. खोके बोके एकदम ओके, कोण म्हणतंय खुद्दार कोणी गद्दार ते म्हणत राहणार आहे, आम्हाला बाळासाहेबांनी विचाराच्या अनुशंगाने उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करुन वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाला विजयाचा गुलाल लावायचा असल्याची भावना करण गायकर यांनी व्यक्त केल्या .
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार करण गायकर व मालती थवील यांच्या नामांकन शक्तीप्रदर्शनाच्यावेळी जितेश शार्दुल ऍडव्होकेट विनय कटारे, दीपक भंडारी,विश्वनाथ भालेराव, भीमचंद चंद्रमोरे, अमोल घोडे, एडवोकेट भरत बुकाने,शरद सोनवणे,विवेक तांबे, विनोद भडांगे,साहेबराव शिंदे,दीपक पगारे, महिर गजबे,शिवनाथ अहिरे शंकर अवचार, सोनाली गायकवाड, अनिल कळंके, रमेश गवळी, राहुल पटेकर, राजू गोतीस, सुनील साळवे, दिलीप लिंगायत, बाबा केदारे, अरुण शेजवळ,विशाल भवर,बाळासाहेब जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, अमोल उमेश सोनवणे, प्रवीण धिवरे, बंटी काळे, रामदास निकम,राजेंद्र गवारे,यशवंत शिंदे,आधी स वंचित बहुजन आघाडीचे व छावा क्रांतिवीर सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते