Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
देवणी शहरात दुषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात,नगर पंचायतीच मात्र दुर्लक्ष
Responsive Ad Here
लातूर/देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन
सध्या देवणी शहरात दुषित व दुर्गंधी युक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळें नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याबाबत प्रशासनाने सवच्छ व नियमित पाण्याचा पुरवठा करावा याबाबतचे निवेदन नगर पंचायतिला देण्यात आले आहे, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिले आहेत, याबाबत नगर पंचायत कडून मिळालेली माहिती अशी की, शहरात टाकलेली पाईप लाईन ही खूप जुनी असल्याने जागोजागी गळतीचे प्रमाण वाढले आहे, नळाला तुट्या नसल्यामुळे सांडपाणी व गटाराचे दुषित पाणी पाइप लाइन द्वारे नागरिकांना पुरवठा होत असल्याचे डॉ घोरपडे यांनी सांगितले, वास्तविक पणे प्रभाग क्रमांक 15 व 16 या भागात दलीत मुस्लिम समाज असल्यामुळें नियमीत पाणी पुरवठा नाहीच, महिन्यात केवळ दोन वेळा व ते पण एक तास पाणी पुरवठा होत आहे शहराच्या अन्य भागात दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो, सार्वजनिक पाणी पुरवठा याशिवाय बोअर वेलच्या माध्यमातून सवछ पाण्याचा पुरवठा केला जातो, इतर प्रभागाच्या तुलनेत प्रभाग क्रमांक 15 व 16 मध्ये एक प्रकारचा पाण्याचे दुर्लक्ष होत आहे, विशेष बाबम्हणजे प्रभाग क्रमांक 15 मधून स्वता नगराध्यक्षा निवडून आलेल्या आहेत,दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्या बाबत संबधित वार्डाच्या नगर सेवकाला तोंडी कल्पना दिली होती तरी त्यामध्ये कोणतीही पाईप लाईन ची दुरुस्ती केली गेली नाही यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुषित व दुर्गंधी युक्त पाण्या मुळे संडास उलट्या होणे सर्व समान्य झाले आहे याबाबत नगर पांचयतेने तातडीने दखल घेऊन स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी प्रभाग क्रमांक 15 व 16 मधिल नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे,आठ दिवसात यामध्ये कुठलाही बदल अथवा दुरुस्ती हाती घेतली नाही तर नगर पंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420