Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या पावसासह विजेचा कहर,वीज पडून तिघे ठार,तर पाच म्हशी दगावल्या

Responsive Ad Here
लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन*
लातूर जिल्ह्यात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाबरोबर वीज कोसळून तिघे ठार तर पाच म्हशी दगावल्या,चाकुर तालुक्यातील महाळंगी ता.चाकुर २६ मे रोज रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज कोसळून शिवाजी नारायण गोमचाळे अंदाजे वय ३५ वर्षे व ओम लक्ष्मण शिंदे अंदाजे वय ३० वर्षे याचा जागीच मृत्यू झाला आहे,तर शिवनखेड तालुका चाकूर येथील श्री प्रभू रामा कोपले यांची म्हैस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून मयत झाली आहे. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील बळीराम व्यंकट हणमंते वय ३५ वर्ष यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडुन ठार झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत.तर शेळगी तालुका निलंगा येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची म्हैस विज पडून ठार झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौ.हालकी येथे २६ मे रोज रविवारी पाच वाजता श्री गंगाधर माधवराव बामनकर यांची एक म्हैस वीज पडून मयत झाली. लातूर तालुका येथील तांदुळजा येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक म्हैस आणि मौजे काटगाव,कृष्णानगर तांडा,तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.