Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
बातमी का लावली म्हणून पत्रकार प्रकाश तिरळे यांना मारहाण,आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे निवेदन
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ*
बातमी का लावली म्हणून पत्रकार प्रकाश तीराळे यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसद यांच्या वतीने दि. 13 मे 2024 रोजी पुसद उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड नगरपरिषदेचा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी "बायकांनी भर चौकात मारहाण, केल्याची बातमी आपल्या वृत्तपत्रात का? लावली म्हणून, ९ मे २०२४ रोजी पत्रकार प्रकाश तीराळे यांना रोडवरून फरफटत नेले आणि मारहाण केली, या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी पत्रकार प्रकाश तीराळेवर दबाव आणून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते.परंतु जिल्ह्यातील पत्रकारांनी पोलीसावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणल्याने अखेर गुंड प्रवृत्तीचा जिल्हाप्रमुख त्यांचे साथीदार आसिफखान उर्फ मॉन्टी असदखान जमादार, संदीप अशोक सनगर यांचेवर "पत्रकार संरक्षण कायद्यानुसार, गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु पोलिस यांना अटक करण्यास टाळाटाळ करीत असून, या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी करिता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद येथे सुद्धा पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव राजेश सोनुने, तालूका अध्यक्ष राजू राठोड, तालुका ग्रामीण अध्यक्ष राजेश ढोले, तालुका सचिव कुलदिप सुरोशे,शब्बीर शेख, कैलास श्रावणे, विजय निखाते, ऋषिकेश जोगदंडे, प्रशांत देशमुख मारोतराव कांबळे,प्रशांत राठोड इत्यादींच्या सह्या आहेत.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420