Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचं निधन
Responsive Ad Here
मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक विचारांचे लढाऊ पँथर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते.
पँथर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते. गंगाधर गाडे महाराष्ट्राचे माजी परिवहन राज्यमंत्री होते. ते पँथर चळवळीत लोकप्रिय नेता होते. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते.
७ जुलै १९७७ रोजी दलित पँथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती. १९९४ मध्ये, मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार केला गेला.
गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला. १९७२ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. ते मंत्री देखील राहीले आहेत. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
गाडेंच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
*रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420