Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
रात्रीचा वेळी लूटमार करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ*
पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्रमांक ३२७/२०२४ कलम ३९२,३४ भा.द.वी मधील तक्रारदार फिर्यादी ज्ञानेश्वर नारायण पवार वय ३८ वर्ष रा. राजुरा ता. महागाव यांनी दिनांक २१ मे २०२४ रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती, त्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आयकॉन हॉस्पीटल पुसद येथे त्यांची पत्नी उपचारकामी भरती असतांना तिला ब्लड आणनेकामी सत्यंशांती हॉस्पीटल येथे जावुन रात्री १०.३० वाजता मी परत येत असतांना हिन्दी हायस्कुल जवळ पुसद येथे चार अज्ञात ईसमांनी त्याचे गळ्यावर चाकु लावुन त्यांचे खिशात उपचारा करीता असलेले पैसे नगदी १५,०००/- रू व विवो कंपनीचा मोबाईल किंमत ६०००/- रू असा एकुन २१,०००/- रू चा मुद्देमाल घेवुन पसार झाले आहे.
त्यानुसार पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्यांची नोंद होताच
गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत ईसमशेख रेहान शेख गुलाब वय २० वर्ष रा. तुकाराम बापु वार्ड ह.मु वसंतनगर पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ यास ताब्यात घेवुन कौशल्य पुर्वक विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली, या गुन्हात आयान काजी सैफोदिन काजी वय १९ वर्ष, शेख नोमान शखे रहेमान वय २२ वर्ष, शेख अजिम शेख कयुम वय २० वर्ष सर्व रा. वसंतनगर पुसद सदर आरोपीचा पोलीस स्टेशन वसंतनगर परिसारात कौशल्यपुर्वक व सापळा रचुन चारही आरोपस अटक केली.त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली एक मोटर सायकल हिरो होन्डा स्प्लेंडर एम.एच २७ /डि.डी ६८०९ किंमत अंदाजे ४५,०००/- रू, व एक धारदार काळया रंगाचा हिरवी मुठ असलेला चाकु किंमत १२०/- रू असा एकुन ६६,१२०/- चा मुदेमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला.
सदरची कार्यवाही यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक श्री पियुष जगताप,सहायक पोलीस अधिक्षक तथा उप. विभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शानाखाली व पोलीस निरिक्षक श्री उमेश बेसरकर यांचे सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक निलेश देशमुख, पोलीस हवालदार प्रफुल ईगोले, मनोज कदम, पोलीस कॉन्स्टेबल शुध्दोधन भगत, आकाश बाभुळकर इत्यादींनी कार्यवाही केली आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420