Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
माहूर तालुक्यात गावठी व बनावट दारूचे अनेक ठिकाणी कारखाने., पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोजपणे दारूचे अड्डे खुलेआम सुरू
Responsive Ad Here
राज्य उत्पादन शुल्क किनवट विभाग ‘रसद’ गोळा करण्यात मश्गुल
श्रीक्षेञ माहूर - कार्तिक बेहेरे
दुर्गम डोंगरदऱ्यात व्यापलेल्या माहूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क किनवट यांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अनधिकृतपणे विदेशी दारू तर गावठी दारुची विक्री जोमात सुरू असल्याची चर्चा असून काही गावात थेट गावठी दारू काढण्याचे कारखाने थाटल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व घडत असताना यावर नियंत्रण ठेवणारे राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवट हे आर्थिक उन्नत्ती करत सर्व नियम ढाब्यावर बसवित असल्याचा हि आरोप होत आहे.
नांदेड जिल्ह्याचा अंदमान निकोबार संबोधल्या जाणाऱ्या माहूर किनवट हे तालुके जिल्हा मुख्यालयापासून दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. अशात जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून तालुका स्तरावरील अधिकारी यांच्या अर्थपूर्ण संबंधातून दोन नंबरी व्यवसाय जोमात सुरू आहेत.मग ते महसूल,पोलीस असो किंवा मग राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष करून अवैध व्यवसायात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास येत आहे.काल अवैध गौण खनिज नियंत्रण पथकातील प्रमुख माहूर तहसीलचे नायब तहसीलदार कैलास जेठे हे कर्तव्यावर असताना त्यांना पैनगंगा नदी परिक्षेत्रात अनेक ठिकाणी गावठी दारू पाडण्याच्या भट्ट्या आढळून आल्या,परंतु कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने अखेर त्यांना हा प्रकार पाहून दुर्लक्ष करावे लागले.माहूर तालुक्यात आज घडीला दारू विक्रीचे अनुज्ञप्तीधारक दुकाने बोटावर मोजण्या इतकी असताना तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती व ८३ गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी गावठी हातभट्टी सह देशी व विदेशी दारू उपलब्ध आहे.कार्यवाही करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन कारवाई करणे शक्य नसल्याचे बोलण्यात येते,परंतु परवानाधारक बार,देशी दारू दुकान,वाईन शॉप याच्या नूतनीकरणाच्या वेळेस व महिन्याच्या विशिष्ट तारखेला प्रतिनिधी पाठवून रसद गोळा करण्याचे कर्तव्य मात्र हे लोकं नित्यनियमाने पार पाडतात.त्यामुळेच की काय यांचे तालुक्यात येणारी बनावट दारू व खेडेगावात पाडली जाणारी हातभट्टीची दारू बनवणाऱ्या वर कारवाई करण्यासाठी वेळ मिळत नाही. दारू पिल्याने मद्यपिंचे केवळ संसार उघड्यावर येत नाहीये,तर रासायनिक प्रक्रिया केलेली विषारी दारू पिल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊन नजीकच्या काळात अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले हे उघड सत्य आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवट चे कार्यालय फक्त शोभेची वस्तू बनली असून येथील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी उंटावर बसून शेळ्या राखण्याचे काम करत आहे,या प्रकरणी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांनी प्रभावी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
चौकट..
अवैध हातभट्टी व बनावट दारू संदर्भात राज्य उत्पादन शुल्क किनवटचे दुय्यम निरीक्षक श्री.पवार यांना संपर्क साधून त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आम्ही कारवाया करत आहोत,इतके बोलून अतिशय नाराजीने संपर्क समाप्त केला.
चौकट
माहूर तालुक्यातील वानोळा व माहूर महसूल मंडळातील भागांमध्ये अवैध गौण खनिज विरोधात कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना ठराविक अंतरावर गावठी दारू काढण्याच्या भट्ट्या लावण्यात आले होते,परंतु कारवाईचे अधिकार नसल्याने तिथून काढता पाय घ्यावा लागला.
कैलास जेठे,
नायब तहसीलदार तथा पथक प्रमुख,
अवैध गौण खनिज,माहूर.
चौकट...
तालुक्यात कायदा-सुव्यस्थेचे तीन तेरा,माहूर-किनवटचा बिहार झालाय का?
एकेकाळी किनवट- माहूर तालूका हा कायदा आणि सुव्यवस्थेचे आदर्श उदाहरण वाटु लागले परंतु आता वाढत्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाने दोन्ही तालुके आता बिहार झाले का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून किनवट व माहूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच मागिल आठवड्यात किनवट तालुक्यात एका महिलेसह दोन निरागस बालकाचा खून, त्यानंतर पत्नीच्या अंगावर पतीने ज्वलंत पदार्थ टाकुण जिवत पेटवण्याचा प्रयत्न नंतर घरबांधकाम करणार्या मजुराचा खून, अशातच माहूर तालुक्यात आष्टा शिवारात एका शेतात महिलेला जाळल्याची घटना घडली, आशा या घटनांनी दोन्ही तालुक्यात एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणानंतर दोन्ही तालुक्यातील महिला सुरक्षित आहेत का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420