औरंगाबादच्या फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा पूर वाडी येथे विहिरीत मृत्यूदेह अढळला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 8 जून रोजी कृष्णापुर वाडी शिवारातील शेत गट नंबर सहा मधिल कोरड्या विहिरीत एक अनोळखी पुरूष जातीचा वयोवृद्ध इसम मरण पावला आहे. तक्रारीवरून पोलीस ठाणे फुलंब्री येथे अ.मु.क्र. 32/2024 कलम 174 सी. आरपी. सी प्रमाणे दाखल झाला असून मयत अनोळखी इसमाचे अंदाजे वय 55 ते 60 वर्षे. रंग सावळा. उंची पाच फूट. चेहर्यावर पांढरी बारीक दाढी. अंगात पांढर्या कलर ची बनियन व निळ्या कलरची नाईट पॅन्ट. अशा वर्णनाचे इसमास कोणी ओळखत असल्यास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांचे फोन नंबर 8657804438 किंवा पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांचे फोन नंबर 8108767620 वर संपर्क करून कळवावे असे सांगण्यात आले.
*रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा*