Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

परभणीत संजय जाधव यांची खासदारकीत हॅट्रिक; महादेव जानकरांचा पराभव

Responsive Ad Here
परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे
परभणी लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल समोर आला आहे. परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी विजय खेचून आणत खासदारकीची हॅट्रिक केली असून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 1 लाख 30 हजाराच्या फरकाने विजयी झाले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव विरुद्ध महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यामध्ये लढत झाली. त्याचबरोबर हवामान अंदाजक म्हणून शेतकरी वर्गामध्ये प्रसिद्ध असणारे पंजाबराव डख यांनीही वंचित बहुजन आघाडी कडून अर्ज भरला होता. मात्र या लढतीत संजय जाधव यांनी बाजी मारली. आजच्या मतमोजणीत संजय जाधव यांनी पहिल्यापासून आघाडी घेतली होती. अखेर त्यांचा तब्बल एका लाखांच्या मतांनी विजय झाला. संजय जाधव यांच्या या विजयाने ठाकरे गटाने ३५ वर्षांचा किल्ला अभेद्य ठेवला असून महादेव जानकर यांना चौथ्यांदा खासदारकीने हुलकावणी दिली आहे.यावेळी सुरूवातीला महादेव जानकर हे माढ्यातून लढणार असल्याची चर्चा होती. मात्र अजित पवार गटाने त्यांची मनधरणी करत आपल्या कोट्यातून परभणीची जागा दिली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा झाली होती. मात्र त्यांच्या सभेचीही जादूही फेल गेल्याचे दिसत आहे.