Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून संदीपान भूमरे विजयी,इम्तियाज जलिल यांना मोठा धक्का
Responsive Ad Here
औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा*
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे विजयी झाले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहे. सगळीकडे धक्कादायक निर्णय लागले आहेत. त्याच प्रमाणे मोठ मोठे दावे करणारे एक्झिट पोल सुद्धा तोंडघशी पडले आहेत. या वेळी जनतेने लोकशाहीच्या या निवडणुक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदानाचे टक्केवारी वाढली होती.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून या वेळी निवडणुकीत एकूण 37 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. व काही उमेदवारांनी एक्झिट पोल बघून गुलाल सुद्धा उधळले होते. मात्र जे एक्झिट पोलच्या कधी मनात ही नव्हते ते उमेदवार म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी 4 लाख 76 हजार 130 मते घेऊन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे रनीगं खासदार इम्तियाज जलिल यांचा एक लाख 34 हजार 650 मताने पराभव केला आहे.
इम्तियाज जलिल यांना एकूण 3 लाख 41 हजार 480 मते मिळाली आहे. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 2 लाख 93 हजार 450 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी 69 हजार दोनशे 66 मते घेतली. तसेच हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवित 39 हजार 828 मते घेतली. बहुजन समाज पार्टी चे उमेदवार संजय जगताप यांनी 8 हजार 252 मते घेतली.
या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 59 हजार 710 आहे पैकी 12 लाख 99 हजार 040 मतदान झाले होते.
त्यात कन्नड मतदार संघातून 2 लाख 17 हजार 089 मतदान झाले.
औरंगाबाद मध्य तून 2 लाख 11 हजार 500 मतदान झाले.
औरंगाबाद वेस्ट मधून 2 लाख 35 हजार 784 मतदान झाले होते.
औरंगाबाद ईस्ट मधून 2 लाख 6 हजार 633 मतदान झाले होते.
गंगापूर मतदारसंघांतून 2 लाख 27 हजार 152 मतदान झाले होते.
वैजापूर येथून 2 लाख 882 मतदान झाले होते तर नोटा ला 5 हजार 773 मते मिळाली आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420