Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पिवरडोल येथे जलजीवन मिशन अंतर्गत 70 लाख रुपयांचे काम अर्धवट अवस्थेच..
Responsive Ad Here
*पिवरडोल येथे 70 लाख रुपयाचे पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत..!*
*केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ*
यवतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील पाटणबोरी येथून 4 किलो मिटर अंतरावरील पिवरडोल जल जीवन मिशन अंतर्गत 70 लाख रुपयाचे पाण्याच्या टाकीचे बांधकाम उभरण्यात आले. मात्र अखा उन्हाळा जाऊन सुद्धा येथील जनतेला शुद्ध पाणी प्यायला मिळाले नाही. गेल्या दोन वर्षापासून बांधकाम करून अर्धवट अवस्थेत असून पाण्याची टाकी लिकेज आहे. तसेच अजूनही कलरिंग कामे सुद्धा झाले नाही. गावातील सिमेंट रस्ते फोडून पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली मात्र रस्ते सुद्धा बुजविण्यात आले नाहि रस्त्याने पायवाट व मोटरसायकल सुद्धा बरोबर चालता येत नाहि. वरांवर बांधकाम विभाग अभियंता यांना सरपंच ,उपसरपंच यांनी फोनद्वारे संपर्क साधला असता दुर्लक्ष करत असून संबंधीत ठेकेदार व अभियंता यांच्यात साटेलोटे आहेत की काय असे उडवा उडविचे उतर देतात. पाण्यासाठी दोन बोअरवेल खोदण्यात आले. मात्र त्या ठिकाणीं विद्युत पुरवठा पुरविण्यात आला नाही. पाण्याची टाकीचे बांधकाम अर्धवट अवस्थे, गावात नळ कनेक्श पुरविण्यात आला नाही. व नळ योजना घरो घरी पुरविण्यात आली नाही. एकीकडे लाखो रुपये खर्च करून जनतेचा पाणी पुरवठा करण्यात आला नाहि. आता पावसाने दिवस आले असून जनतेचा गढूळ पाणी प्यावे लागत आहे. तरी या भागाचे आमदार, जिल्हा परिषद प्रतिनीधीयांनी या गावाकडे लक्ष वेधून 70 लाख रुपयाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी येथील जनतेकडून मागणी होत आहे...!
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420